भंडारदरा वीकेंडला हाऊसफुल्ल! काजवा महोत्सव आणि गिर्यारोहणासाठी हजारो पर्यटकांची गर्दी

भंडारदऱ्यात काजवा महोत्सव आणि सुट्टीमुळे हजारो पर्यटकांची गर्दी झाली. टेंट कॅम्पिंग, गिर्यारोहण, बोटिंगला प्रतिसाद मिळाला. गर्दीमुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली, मात्र वन विभागाच्या नियंत्रणामुळे अनुचित प्रकार टळले.

Published on -

Ahilyanagar News: भंडारदरा- पर्यटनाची पंढरी महणून प्रसिद्ध असणारा भंडारदरा वीकएंडच्या सुट्टीला हाऊसफुल्ल झालेला दिसून आला. हजारो पर्यटकांनी भंडारदऱ्यातील काजया महोत्सवाचा आनंद घेत निसर्ग सौंदर्याची अनुभुती घेतली.

अकोले तालुक्यातील पश्चिमेला असणाऱ्या भंडारदऱ्याला निसर्ग पर्यटनाची पंढरी म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे. सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू असून शनिवारी व रविवारी हजारो पर्यटकांनी भंडारदऱ्याला भेट देत निसर्ग पर्यटनाचा आनंद उपभोगला. भंडारदऱ्याच्या कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात मागील आठ दिवसांपासून काजव्यांचा चमचमाट दिसू लागला आहे. 

काजवा महोत्सव

काजव्यांचा अविस्मरणीय असा हा सोहव्या बघण्यासाठी भंडारदऱ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. हजारो पर्यटक दरवर्षी या काजवा महोत्सवाचा आनंद घेतात. यावेळी पर्यटकांनी भंडारदन्याला मुक्कामासाठी टेंट कॅम्पिगचा आसरा घेतला, तर काहींनी पर्यटक निवासामध्ये थांबणे पसंत केले. रात्रीच्या अंधारात काजव्यांचा चमचमाट बघण्यारहठी पांजरे, उडदावणे, साम्रद, मुतखेल, रतनवाडी या परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी व रविवारी दिवसभर पर्यटकांनी रतनगडावर गिर्यारोहण करणे पसंत केले. 

कळसुबाई शिखरावरही गर्दी

तर महाराष्ट्राचे एवरेस्ट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कळसुबाई शिखरावरही मोठ्या प्रमाणात गिर्यारोहक चढाई करताना दिसून आले. भंडारदरा धरणामध्ये बोटिंग करण्यालाही पर्यटकांचा प्रतिसाद दिसून आला. पर्यटकांची उसळलेली गदीं भंडारदन्याच्या व्यावसायिकांनाही फायदेशीर ठरली. धरणाच्या सांडव्याजवळ वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येत होत्या. 

गर्दीमुळे वाहतूक कोंडी

अस्ताव्यस्त लावलेल्या पर्यटकांच्या गाड्यांनी काही काळ वाहतूक कोंडी झाली. वन्यजीव विभागाकडून नियंत्रण ठेवण्यात आल्याने पर्यटकांची गर्दी असतानाही कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe