कोपरगाव : खरीप हंगामात शेतकऱ्यांना युरियाचा पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी सरकारने युरियाचा ५० टक्के बफर स्टॉक खुला केला आहे. त्यामुळे सहकारी संस्था आणि खाजगी डीलर्सकडे युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध होईल. यासाठी विवेक कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. परिणामी, शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याने विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.
यावेळी खरीप पिकांचे पेरण्या झाल्याने पिकांच्या वाढीचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे युरिया खताची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत काही भागात युरियाचा तुटवडा जाणवत आहे. वेळेवर खत न मिळाल्यास पिकांची वाढ आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. ही बाब ओळखून कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष कोल्हे यांनी सरकारने त्यामुळे युरियाचा संरक्षित साठा म्हणजेच बफर स्टॉकपैकी किमान ५० टक्के स्टॉक तत्काळ रिलीज करण्याची ठाम मागणी केली होती.

युवा नेते कोल्हे यांनी या मागणीसाठी सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सरकारने ५० टक्के संरक्षित साठा खुला केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शासनाचे कौतुक केले आहे.
शेतकऱ्यांचे हित हेच माझे प्रमुख उद्दिष्ट असून, वेळेवर खत उपलब्ध होणे हे पेरणीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाने यासाठी तातडीने निर्णय घेतला. याबद्दल आपण कृतज्ञ आहे. – विवेक कोल्हे, अध्यक्ष, कोल्हे कारखाना