कुकाणा रोडवरील पेट्रोल पंपाजवळील कॉर्नर जवळ आयशरच्या धडकेत दुचाकीचे नुकसान झाले. नेवासा तालुक्यातील चांदा – कुकाणा रोडवरील पेट्रोल पंपाजवळील कॉर्नर जवळ आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एक महिला गंभीर जखमी झालेली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुकाण्याकडून चांद्याकडे येणाऱ्या (एम.एच. ०२ सी.ई. ८१३७) क्रमांकाच्या आयशरच्या धडकेत चांद्याहून बाजार करून कौठा येथील (एम.एच. १७, व्ही. ८२५८) क्रमांकाच्या दुचाकीवरील अज्ञात व्यक्ती आयशरच्या धडकेत जागेवर ठार झाली. तर मागे बसलेल्या महिलेला जबर मार लागला असून तिला अहिल्यानगर येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची खबर सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय माळी यांना समजताच त्यांनी पी.एस.आय सुरज मेढे तसेच पोलीस हवालदार एन. आर. तुपे व चालक वजीर शेख यांना घटनास्थळी पाठवून अपघातात ठार झालेल्या इसमास उत्तरीय तपासणीसाठी नेवासा येथे पाठविले होते. तसेच पुढील तपासाच्या सूचना दिलेल्या आहे.