कार्यकर्त्यांमुळेच भाजप आज खंबीरपणे उभी, म्हणून कार्यकर्त्यांना खूप महत्व; मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे शहरातील बैठकीत प्रतिपादन

Published on -

अहिल्यानगर- भारतीय जनता पार्टी आज खंबीरपणे जी उभी आहे ती सर्व कार्यकर्त्यांमुळेच. कार्यकर्ता आहे तर पार्टी आहे व सरकार आहे. म्हणून पक्षात सर्व कार्यकर्त्यांना खूप महत्व आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिलेले काम व जबाबदारी मनापासून करून कर्त्यव्य निभावावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटे काहीही करू शकत नाही. पक्षाची खरी ताकद बूथ रचना आहे. शहरातील व जिल्ह्यातील पक्षाची बूथ रचना मजबूत करा, अशा सूचना राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केल्या.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अहिल्यानगरमध्ये गुरवारी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा व शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत बूथ रचनेचा आढावा घेतला. यावेळी मंत्री लोढा यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हध्यक्ष नितीन दिनकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदींसह शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते म्हणाले, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सर्वसमान्य कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेली आहे. कार्यकर्त्यांना बळ देत ते सामाजिक जाणीवेतून काम करत आहेत. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मंत्रालयाच्या योजना राबवण्यासाठी मंत्री लोढा योगदान महत्त्वाचे आहे. प्रास्ताविक जिल्हध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केले.

नितीन दिनकर यांनी आभार मानले. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, शहर जिल्हाध्यक्षा प्रिया जानवे, सरचिटणीस महेश नामदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, अशोकराव गायकवाड, धनंजय जाधव, विनायक – देशमुख, बाबासाहेब वाकळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

योजनांच्या अंमलबजावणीसाठी काम करा

भारतास व महाराष्ट्रास पुढे नेण्यासाठी ज्या सरकारी योजना आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे. केंद्रातील व राज्यातील भाजपाचे सरकार हे आजपर्यंतचे सर्वात प्रसिद्ध सरकार आहे. त्यामुळे आलेल्या संधीचा लाभ घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील भारत व महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी योगदान द्या, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नूतनीकरण होणार

राज्यासह अहिल्यानगरमधील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये लवकरच अत्याधुनिक मशिनरी युक्त नवीन कोर्सेस सुरू होणार आहेत. तसेच छोट्या कार्यकाळाचे नव्या तंत्रज्ञान युक्त कोर्सेसही सुरू होणार आहेत. अहिल्यानगरमध्ये ऑगस्ट महिन्यात महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करणार आहे. राज्याच्या कौशल्य विकास व रोजगार मंत्रालयाकडे एक हजाराहून अधिक कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी उपलब्ध करून दिला आहे. या अंतर्गत राज्यातील व अहिल्यानगर मधील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नूतनीकरण करण्याबरोबरच नवे अद्यावत तंत्रज्ञान युक्त कोर्सेस सुरू करणार आहोत, असेही मंत्री लोढा म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!