करंजी- रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून, रक्तदानामुळे अनेकांचा जीव वाचवते, त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान केले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिराला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचासह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले दिली.
पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी, राहुरी, नगर, अशा विविध ठिकाणी मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चिचोंडी येथे मोठ्या प्रमाणात तरुणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या वेळी मिरी, तिसगाव, करंजी मंडळातील नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर झालेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा अक्षय कर्डिले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या वेळी मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, माजी सभापती संभाजी पालवे, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, मिरी- तिसगाव नळयोजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, मार्केट कमिटीचे संचालक वैभव खलाटे, अरुण रायकर, ज्येष्ठनेते राजेंद्र तागड, माजी सरपंच सुरेश चव्हाण, रवींद्र भापसे, प्रसाद देशमुख, चेअरमन भारत गारुडकर, माजी सरपंच बाबाजी पालवे, संजय शिंदे, महादेव गीते, गणेश खाडे, अरुणदेवा पुंड, संजय स्वामी, नंदकुमार लोखंडे, शुभम मोटे, प्रदीप टेमकर, बाळासाहेब बांगर, किरण गर्जे, गणेश शिदोरे, रामेश्वर फसले, बच्चू कराळे, आदिनाथ कराळे, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष विवेक मोरे, उपाध्यक्ष देवेंद्र गीते पाटील, सरपंच श्रीकांत आटकर, बापूसाहेब मीरपगार, सुनील औताडे, कमलेश गुगळे, संदीप दानवे, शिवाजी जाधव, संतोष ससे, महेश औटी, डॉ. गोरक्ष गीते, वहाब इनामदार, बब्बू शेख, सिंधुबाई आहेर, शबाना शेख यांच्यासह अहिल्यानगर येथील अर्पण ब्लड सेंटरच्या डॉ. भाग्यश्री पवार, डॉ. धनश्री आरंगळे, निकीता बरवेकर, रितेष राठोड, भगवान सांगळे, धम्मदिप वानखेडे यांच्यासह ३९ गावांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.