ग्राहकांच्या तक्रारी व गैरसमज दूर करून BSNL उत्तम सेवा देणारी कंपनी म्हणून लवकरच प्रथम क्रमांकावर येणार

Published on -

श्रीरामपूर- भारतीय दूरसंचार निगमच्या कारभाराबद्दल दूरध्वनी धारकांच्या असलेल्या तक्रारी व गैरसमज दूर करून उत्तम सेवा देणारी कंपनी म्हणून सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन टेलिफोन निगमचे नूतन संचालक ॲड. रवींद्र बोरावके यांनी केले.

शहरातील माळी बोडींग येथे माळी बोर्डोंग, समता प्रतिष्ठान व अखिल भारतीय महात्मा फुले, समता परिषद आदींच्या संयुक्त विद्यमाने भारत संचार निगमच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अॅड. रवींद्र बोरावके व आरोग्य मित्र, नागेबाबा परिवाराचे सदस्य सुभाषराव गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल नुकताच नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी अॅड. बोरावके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे होते. याप्रसंगी आ. हेमंत ओगले, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, श्री इम्पेक्सचे संचालक विजय कुदळे, कोपरगाव माळी बोर्डीगचे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे, श्रीरामपूर माळी बोर्डिगचे अध्यक्ष दीपक गिरमे, विश्वस्त सुरेंद्रनाना गिरमे व पदाधिकारी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कुहे, तालुकाध्यक्ष चंद्रकांत झुरंगे, विवेक गिरमे, प्राचार्य टी. ई. शेळके, प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, शंकरराव गागरे, शिवाजीराव बारगळ, शशांक रासकर, जालिंदर कुडे, सुनील सोनवणे, बाळासाहेब हरदास, राजेंद्र सातभाई, दादासाहेब मेहेत्रे, सुभाष वाघुंडे, सचिन गिरमे, विलास घोगरे, एकनाथ दुधाळ, ज्येष्ठ नागरिकचे लक्ष्मण निकम, एस. के. कुहे, विलास कुदळे, राऊत, होले, अशोक ससाणे, लक्ष्मण आगरकर, अशोक सोनवणे, किशोर ससाणे, प्रभाकर भोंगळे, ज्ञानेश्वर पवार, डॉ. लोंढे आदींसह श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ. हेमंत ओगले, करण ससाणे व सचिन गुजर आदींनी मनोगतातून अॅड. बोरावके यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी चंद्रकांत झुरंगे यांनी प्रास्ताविक केले. तर प्रसन्न धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!