सोशल मीडियावर संस्थेची बदनामी करणाऱ्या वर गुन्हा दाखल शाळेबाबत खोटी बदनामी केल्याने गुन्हा दाखल

Published on -

संगमनेर (प्रतिनिधी)–राज्यातील सर्व आदिवासी शाळांसाठी अत्यंत आदर्शवत असणारी आणि राज्य पातळीवर सातत्याने गुणवत्तेमध्ये विविध पुरस्कार मिळवणारी जय हिंद आदिवासी आश्रम शाळा कोळवाडे ही राज्यात नामांकित आहे. मात्र काही लोकांनी सोशल मीडियावर खोटी आणि चुकीचा मजकूर पसरविल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचे साधन आहे .मात्र अनेक जण त्यावर कोणताही विचार न करता चुकीच्या माहितीचा आधार घेऊन गैरसमज निर्माण करतात. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून या वाढलेल्या प्रकारामुळे समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तरुणांनी नेहमी जागरूक राहून आपले मत व्यक्त केले पाहिजे मात्र कोळवाडे शाळेच्या बाबत सुरेश बारकू काळे राहणार कोळवाडे यांनी जनसेवा मित्र मंडळ कोळवाडे या व्हाट्सअप च्या ग्रुप वर शाळेच्या बाबत चुकीचा मजकूर प्रसिद्ध केला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गावातील अनेक जण विविध ग्रुप वर सातत्याने अत्यंत चुकीचा गैरसमज पसरवत असतात. आणि हे चुकीचे गैरसमज पसरवणारे सर्व रात्री नऊच्या पुढे व्हाट्सअप वर ऑनलाइन येऊन एकमेकांशी गप्पा मारतात. त्यांची त्यावेळची अवस्था आणि त्यांच्या गप्पा याबद्दल नागरिकांची कायम नाराजी राहिली आहे.

हा गुन्हा म्हणजे चुकीचे गैरसमज पसरवणाऱ्यांना चपरापासून यापुढील काळामध्ये कोणीही सोशल मीडियावर चुकीचा गैरसमज पसरू नये असे आवाहन कोळवाडे ग्रामस्थांनी केले आहे याबाबतची फिर्याद त्यांनी संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.

जयहिंद लोकचळवळीच्या वतीने सप्तशृंगी गडावर 55000 देशी वृक्षांचे रोपण महाराष्ट्राचे साडेतीन पिठांपैकी महत्त्वाच्या असलेल्या सप्तशृंगी गडावर जय हिंद लोक चळवळीच्या वतीने 55 हेक्टर क्षेत्रामध्ये 55 हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली जयहिंद लोकचळवळ पर्यावरण संवर्धनासाठी करत असलेले काम हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आयकर अप्पर आयुक्त भरत आंधळे यांनी काढले आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!