श्रीगोंदा- शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ कर्जफाफी द्यावी या मागणीसाठी दि.२४ जुलै रोजी श्रीगोंदे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष सुरेश सुपेकर यांनी निवेदनाद्वारे इशारा दिला.
भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीत आम्हाला मते द्या, आमची सत्ता आल्यास सरसकट कर्ज माफी करू असे आश्वासन दिले होते मात्र सरकार सत्तेवर आले तरी अजून शेतकऱ्याना कर्ज माफी नाही त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज माफी द्यावी.

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, शेतमजूर मेंढपाळ, मच्छिमार व कामगार यांच्या न्याय मागणीसाठी तसेच कर्ज माफीसाठी राज्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन दि.२४ जुलै रोजी करण्यात येणार आहे. श्रीगोंदा येथे देखील दौंड जामखेड रोडवर आंदोलन करण्यात येणार आहे. या बाबतचे निवेदन श्रीगोंदे पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना देण्यात आले आहे.