अहिल्यानगर- शनिशिंगणापूर देवस्थान घोटाळा आणि कर्मचारी भरतीचा विषय विधानसभेत गाजला. त्यामुळे देवस्थानच्या कारभारावरच प्रश्न उपस्थित झाले. शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये झालेल्या घोटळ्याच्या तक्रारीची राज्याच्या धर्मादाय आयुक्ताने दखल घेतली आहे. धर्मादायुक्तांना स्वतःहून देवस्थान विश्वस्तांना नोटिसा पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
श्री शनिशिंगणापूर देवस्थान भक्ताचे श्रद्ध्द्धस्थान आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देवस्थान महाराष्ट्राच्या चर्चेचा मुद्दा ठरत आहेत. देवस्थानमधील कर्मचारी भरती घोटळा, बनावट अॅप घोटाळा असे विषय गाजत आहेत. यातील काही विषयांवर विधानसभेत चर्चा झाली. विश्वस्तांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

ही कार्यवाही महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० मधील कलम ४१ अंतर्गत करण्यात आली असून प्रकरण क्रमांक २०/२०२५ नुसार, या प्रकरणात गंभीर अनियमितता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाने हे प्रकरण स्वतः हून (सुमोटो) उचलून घेतले आहे.
विश्वस्त यांना १८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ : ३० वाजता धर्मादाय आयुक्त कार्यालयात (मुंबई) व्यक्तिशः किंवा वकीलामार्फत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी या तारखेस अनुपस्थित राहिल्यास प्रकरणाची सुनावणी त्यांच्या अनुपस्थितीत केली जाईल, असा स्पष्ट इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.