अहिल्यानगर- जिल्हातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी गावात असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स दरोड्यातील मकोका आरोपींना औरंगाबाद हायकोर्टात जामीन मंजूर झाला आहे.
जिल्हातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी गावात, फिर्यादी अक्षय संजय थोरात याच्या काकाचे लक्ष्मी ज्वेलर्स नावाने सोने चांदीचे दुकान आहे. दि. १९ ऑगस्ट २०१८ रोजी, संध्याकाळी ७.४५ वाजता पाच अनोळखी इसम दुकानात घुसले त्यापैकी एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात लोखंडी कोयता व दोघांच्या हातात लाकडी दांडे होते.

सदर गुन्ह्याच्या कामी आरोपी अर्जदार अजय बंडू काळे व बुच्चा रामदास भोसले यांना दि. ६ सप्टेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली वरील अर्जदारांनी मकोका स्पेशल केस क्र. ४/२१ मध्ये जामीनासाठी कोपरगाव येथील जिल्हा न्यायालयात अर्ज केला व सदर अर्ज हा विशेष न्यायाधीक्ष, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम, कोपरगाव यांनी दि. २९ मार्च २०२५ रोजी नामंजूर केला.
त्यानंतर वरील अर्जदारांनी अॅड. फैसल न. शेख यांच्या मार्फत बेल अर्ज क्र. ६६९/२०२५ व ७९९/२०२५ दाखल केले. सदर जामीन अर्जाच्या चौकशीच्या कामी आरेपी तर्फे अॅड. नसीम आर. शेख यांनी मे. कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले कि, वरील दोन्ही अर्जदारांना दि. ६ सप्टेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली असून, आरोपी हे गेल्या ७ वर्षांपासून जेलमध्ये आहे व त्यामुळे आरोपीच्या जलद न्यायाच्या हक्काला बाधा येत आहे.
उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकून औरगाबाद हायकोर्टाच्या (मा. ना. अरूण पेडणेकर) यांच्या खंडपीठाने वरील दोन्ही जामीन मंजूर करून आरोपीना जामीनावर सोडण्याचा आदेश ७ जुलै २०२५ रोजी पारीत केला. सदर जामीन अर्जाच्या कामी आरोपीतर्फे अॅड नसीम आर. शेख यांनी काम पाहिले त्यांना अॅड. फैसल शेख यांनी मदत केली व सरकारतर्फे अॅड. एस. एम. गणाचारी यांनी काम पाहिले.