कर्जत तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षकाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला सन्मान

Published on -

राशीन- कर्जत तालुक्यातील चिलवडी येथील सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल कारभारी जगताप हे सन १९७५ ते १९७७ दरम्यान देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांच्या जपवणुकीसाठी अत्यंत कठोर परिस्थितीतही निडरपणे उभे राहिले.

तसेच हुकूमशाहीचा धाडसाने प्रतिकार करून, कारावास स्वीकारून स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी संघर्ष केला. या योगदानाबद्दल त्यांचा गौरवपूर्ण सन्मानपत्र देऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल कारभारी जगताप यांचे सन्मानपत्र पाठवून अभिनंदन केले आहे. सन्मानपत्रात आपण आपल्या कृतीतून, विचारांतून नव्या पिढीसमोर लोकशाही मूल्यांचा आदर्श ठेवला आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे म्हटले आहे.

कर्जत येथील जेलर परशुराम होगले यांच्या हस्ते विठ्ठल कारभारी जगताप यांना वयाच्या (८५) व्या वर्षी गौरवपूर्ण सन्मानपत्र देण्यात आले. त्यांच्या या उल्लेखनीय सन्मानाबद्दल कर्जत तालुक्यासह राशीन पंचक्रोशी व चिलवडी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!