भिंगार शहरात स्वच्छतेचा उडालाय बोजवारा, परिसरात कचऱ्यांचे ढीगच ढीग, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Published on -

अहिल्यानगर- भिंगार शहर परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच या भागातील अनेक पथदिवे बंद पडल्याने रात्री या भागात अंधाराचे सामाज्य असते.

तरी या कचरा व्यवस्थापन व पथदिवे सुरू करण्याबाबत भिंगार राष्ट्रवादीच्यावतीने कॅन्टोमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांना आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिले आहे.

नगर शहरातून भिंगारमध्ये प्रवेश करताना नाला परिसरात व भिंगार परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. कचरा व्यवस्थापनाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून, धार्मिक स्थळासमोर देखील मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा साचून राहत असून, त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही.

नागरिकांना साठलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच भिंगार अर्बन बँके ते स्टेट बँक चौक दरम्यान रस्त्यावर असलेले अनेक पथदिवे बंद आहेत.

त्यामुळे रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. पथदिव्यांवर झाडाच्या फांद्या लोंबकळत असून, काही ठिकाणी धोकादायक पध्दतीने विजेच्या तारा खाली आल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रश्नावर तातडीने लक्ष घालून भिंगार शहर परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.

आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या निवेदनाप्रसंगी राष्ट्रवादीचे माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, मंगेश खताळ, युवकचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी, विशाल बेलपवार, संपत बेरड, सुदाम गांधले, दीपक लिपाणे, मतीन ठाकरे, सिद्धार्थ आढाव, मारुती पवार, प्रशांत डावरे, अनिल तेजी, ज्ञानेश्वर फासे, संजय खताडे, रत्नदीप गारुडकर, दिनेश लंगोटे, अरुण वाघ, सागर चवंडके, संकेत झोडगे, प्रमोद जाधव, अक्षय पथारिया, प्रकाश वाव्हळ आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!