Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लाखो लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वपूर्ण योजनेच्या बाबत CM फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांना आता अखेर दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील फलटण येथे आयोजित कार्यक्रमात या योजनेबाबत महायुतीची स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे.
त्यांनी साताऱ्यात बोलतांना सांगितले की, जोपर्यंत देवाभाऊ, शिंदे साहेब आणि अजित दादा आहेत, तोपर्यंत ‘लाडकी बहीण योजना’ कधीच बंद पडणार नाही. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जात आहे. आतापर्यंत सप्टेंबर महिन्यापर्यतचा लाभ मिळाला आहे. आता ऑक्टोबरचा हप्ता केव्हा मिळणार याची आतुरता आहे.

हा हफ्ता थकबाकीत असल्याने महिलांमध्ये उत्सुकता होती की, पैसे खात्यात कधी जमा होतील. या पार्श्वभूमीवर फडणवीस म्हणालेत की, “ही योजना आमच्या बहिणींसाठी दिलेली दिवाळीची भाऊबीज’ आहे. ती सातत्यानं मिळत राहणार आहे, याची मी हमी देतो. फडणवीस यांनी पुढे शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, राज्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी सरकार सातत्याने काम करत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 32 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं असून, त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतो आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, काहीजण अफवा पसरवत आहेत की ‘लाडकी बहीण योजना बंद होणार’, परंतु हे पूर्णतः चुकीचं आहे. सरकारच्या सर्व योजना सुरू राहतील आणि महिलांना नियमित लाभ दिला जाईल. फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाच्या घोषणा केल्या.
त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दिलेली वीजसवलत पुढील पाच वर्षे कायम राहील आणि विजेचे बिल भरावे लागणार नाही. तसेच सौरऊर्जाकरणामुळे 2026 च्या डिसेंबरपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला दिवसाचे 12 तास मोफत वीजपुरवठा उपलब्ध होईल. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर हप्ता लवकरच खात्यात जमा होणार असून, योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













