Ahilyanagar News: अहिल्यानगर- शनीशिंगणापुर येथील श्री शनैश्वर देवस्थानमधील आर्थिक अपहार प्रकरणावरून भाजपचे कार्यकर्ते व शनिभक्त विशाल सुरपुरिया यांनी धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने व कर्मचाऱ्यांनी बनावट ॲपच्या माध्यमातून भाविकांची व देवस्थानची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी
धर्मादाय आयुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी देवस्थानचे सध्याचे विश्वस्त मंडळ तात्काळ बरखास्त करून सक्षम प्रशासक नेमण्याची तसेच घोटाळ्याच्या सखोल चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना करण्याची मागणी केली. त्यांनी महाराष्ट्र सायबर क्राईम व इओडब्ल्यू (इकोनॉमिक ऑफेन्सेस विंग), मुंबईमार्फत सखोल तपासाचे आदेश देण्याची विनंतीही केली.

कोट्यावधी रूपयांचा अपहार
तक्रारीत पुढे नमूद केले आहे की, कोट्यवधी रुपयांचा अपहार हा भाविकांच्या श्रद्धेवर गदा आणणारा आहे. त्यामुळे सदरचे भ्रष्टाचारी विश्वस्त मंडळ तत्काळ बरखास्त करून प्रशासनाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी ॲड. अमित सुरपुरिया व ॲड. स्वाती जाधव यांच्यामार्फत करण्यात आली आहे.