शनिशिंगणापूर येथे बनावट ॲप तयार करून लाखोंचा घोटाळा करणाऱ्यांविरोधात काँग्रेसचे उपोषण, दोषींवर ठोस कारवाई करण्याची मागणी

शनिशिंगणापूर देवस्थान हे बनावट ॲपमुळे अडचणीत आले आहे. येथील काही लोकांनी देवस्थानच्या अधिकृत ॲप ऐवजी खाजगी बनावट ॲप तयार केले. बनावट क्युआर कोडच्या माध्यमातून तसेच बनावट पावती पुस्तकाच्या माध्यमातून देवस्थानला मिळणाऱ्या देणगीचा गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे.

Published on -

Ahilyanagar News: सोनई- शनिशिंगणापूर येथे बनावट ॲप, बनावट देणगी पुस्तक, बनावट कोडच्या माध्यमातून गैरप्रकार झाला आहे. या प्रकरणी ठोस कारवाई करावी, या मागणीसाठी काल मंगळवारी पासून शनिशिंगणापूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य संभाजी माळवदे यांनी उपोषण सुरू केले आहे.

लाखोंचा गैरव्यवहार

गेल्या काही दिवसांपासून शनिशिंगणापूर देवस्थान हे बनावट ॲपमुळे अडचणीत आले आहे. येथील काही लोकांनी देवस्थानच्या अधिकृत ॲप ऐवजी खाजगी बनावट ॲप तयार केले. बनावट क्युआर कोडच्या माध्यमातून तसेच बनावट पावती पुस्तकाच्या माध्यमातून देवस्थानला मिळणाऱ्या देणगीचा गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे.

शनिभक्तांची फसवणूक

शनिभक्तांनी दिलेल्या देणगीच्या माध्यमातून प्राप्त देवस्थानचा निधी खाजगी खात्यावर वळवून घेतला. त्यामुळे देवस्थानचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच शनिभक्तांची देखील मोठी फसवणूक झाली. याविरोधात काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी रीतसर अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक तसेच धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे संबधीतांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली होती.परंतु समाधानकारक ठोस कारवाई न झाल्याने संभाजी माळवदे यांनी शनिशिंगणापूर आवारात उपोषणाास प्रारंभ केला आहे.

सात ते आठ बनावट ॲपची चौकशी होणे गरजेचे

यावेळी माळवदे यांनी देवस्थानने तक्रार केलेल्या तीन बनावट ॲप व्यतिरिक्त इतर सात ते आठ ॲपची चौकशी होणे गरजेचे आहे. बनावट पावती पुस्तकांद्वारे, बनावट क्युआर कोडद्वारे केलेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच देवस्थानने दिलेल्या ॲपच्या परवानगीविषयी चौकशीची मागणी केली. येथील कर्मचाऱ्यांच्या बँक व्यवहाराची पाहणी करून जोपर्यंत पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित होऊन ठोस कारवाई होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा माळवदे यांनी घेतला आहे.

आंदोलनातील उपस्थिती

या आंदोलनात काँग्रेसचे संदिप मोटे,महिला काँग्रेसच्या शोभा पातारे, शहर काँग्रेसचे अंजुम पटेल, संजय वाघमारे, संभाजी ब्रिगेडचे शेषराव गव्हाणे, भाजपचे दादा घायाळ, संजय होडगर, कानिफ जगताप, शेतकरी संघटनेचे अशोकराव काळे, हरिश चक्रनारायण, सतीश तऱ्हाळ, विजय गायकवाड, गणपत मोरे आदींसह शनिभक्त सहभागी झाले आहे.

शिंगणापूर देवस्थान आता शासनाच्या ताब्यात देण्याची वेळ आली असून दिवसेंदिवस गैरप्रकाराची मालिका वाढत चालली आहे. अॅप घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन संबधीतावर कठोर कारवाई व्हावी.– संभाजी माळवदे, पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!