श्रीरामपूर न्यायालयात वकिलावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ न्यायालयीन कामकाज बंद, आरोपीविरोधात ठोस कारवाईची मागणी

Published on -

श्रीरामपूर- येथील न्यायालयात बुधवारी वकील दिलीप औताडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काल गुरुवारी श्रीरामपूर, राहुरी येथील न्यायालयीन कामकाज बंद ठेवून संताप व्यक्त करण्यात आला. तर राहाता न्यायालयातील वकील आज कामबंद ठेवणार आहेत.

याबाबत राहाता येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व राहुरी येथील तहसीलदार यांना काल राहाता व राहुरी तालुका बार असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच श्रीरामपूर वकील संघाने हल्ल्याचा निषेध करत काल न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा ठराव केला.

आरोपीविरुद्ध ठोस भूमिका घेऊन वकील संघास न्याय देत नाही. तोपर्यंत वकील संघ न्यायालयीन कामकाजामध्ये सहभाग नोंदविणार नाही, असा ठराव काल गुरुवारी श्रीरामपूर वकील संघाच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी श्रीरामपूर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आण्णासाहेब लबडे, उपाध्यक्ष ॲड. अनिल काळे, महिला उपाध्यक्ष ॲड. मुमताज बागवान, ॲड. सचिव सिद्धार्थ बोधक, सहसचिव सोनाली भालेराव, खजिनदार ॲड. किरण जऱ्हाड, ॲड. व्ही. एन. ताके, ॲड. विनोद तोरणे, ॲड. बाबासाहेब ढोकचौळे, ॲड. दिपक औताडे, ॲड. प्रसन्ना बिंगी, ॲड. राहुल बारस्कर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

याबाबत राहाता न्यायालयास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर न्यायालयात मंगळवारी ज्येष्ठ विधिज्ञ दिलीप औताडे यांच्यावर न्यायालयासमोर कामकाज करीत असतांना पक्षकाराने हल्ला केला व विधिज्ञांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. त्यामुळे ही घटना अतिशय तीव्र व निषेधार्थ असून त्याविरुद्ध राहाता वकील संघाने घटनेचा निषेध करण्यासाठी व विधिज्ञांना न्याय मिळण्यासाठी आज शुक्रवारी कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय राहाता तालुका बार असोसिएशनच्या वतीने घेतला आहे.

यावेळी राहाता तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव चौधरी, उपाध्यक्ष ॲड. अजित खर्डे, सचिव ॲड. सुधीर बोठे, महिला उपाध्यक्ष ॲड. कविता भालके, सहसचिव ॲड. शरद तांबे, खजिनदार ॲड. प्रवीण साप्ते आदी उपस्थित होते. याबाबत राहरी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात ॲड. दिलीप औताडे हे पक्षकाराची उलट तपासणी घेत असताना पक्षकाराने वकील औताडे यांना कोर्ट हॉलमध्ये मारहाण करुन जखमी केले आहे.

भ्याड हल्ल्याचा आम्ही सर्वजण निषेध नोंदवत आहे. यावेळी राहुरी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे, उपाध्यक्ष ॲड. बाळासाहेब बाचकर, सचिव ॲड. ज्ञानेश्वर येवले, सहसचिव ॲड. योगेश शिंदे, ॲड. मोहनीश शेळके, ॲड. जीवन राऊत, ॲड. राहुल शेटे, ॲड. अमोल डौले, ॲड. प्रसाद कोळसे, ॲड. बाबासाहेब खुरूद, ॲड. अमोल पानसंबळ, ॲड. सुनील घोगरे, ॲड. किरण धोंडे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!