उद्योजक नितीन शेळके यांच्या परिवाराला वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्या कुटंबाला आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही आ. सुरेश धस यांनी दिली.दि.७ जुलै रोजी पुणे-नगर महामार्गावर जातेगाव फाटा येथे. आ. सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारच्य अपघातात पळवे येथील तरुण उद्योजक नितीन शेळके यांचा मृत्यू झाला होता.
नितीन शेळके यांच्या परिवाराला धीर देण्यासाठी काल सायंकाळी मुंबई येथील अधिवेशन संपताच शेळके व कुटुबांचे सांत्वन करण्यासाठी माजी मंत्री व आ. सुरेश धस यांनी काल रात्री पळवे येथे शेळके कुटुबांची भेट घेतली, या वेळी आ. धस बोलत होते.

या वेळी त्यांनी शेळके परिवाराला सांगितले की, नितीनच्या मुलांच्या शिक्षणासाठी व जीवन जगण्यासाठी जी आवश्यक मदत लागेल, ती मदत धस कुटुबांकडून केली जाईन. शेळके परिवार त्यांचे नातेवाईक पळवे खुर्द पळवे बु. व घाणेगाव जातेगाव येथील ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
ग्रामस्थ व नातेवाईकांनी आ. धस यांच्याकडे मागणी केली की, जातेगाव फाटा ते पळवे फाटा येथे नेहमी अपघात होतात, गाडीचा वेग जास्त असतो. त्यामुळे या भागात उड्डाण पूल होण्यासाठी सरकारकडे मागणी करा, अशी मागणी शेळके यांचे नातेवाईक व पळवे ग्रामस्थांनी केली.
त्यावर धस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना याबाबत महिती देऊन त्यांच्याकडे मागणी करतो, असे धस यांनी सांगितले. या वेळी स्वप्निल शेळके, अमोल शेळके, सरपंच जनाबाई तरटे, गोटू तरटे, जातेगावचे चेअरमन दत्तात्रय ढोरमले, गीताराम शेळके आदी उपस्थित होते.