अहिल्यानगर- गणेशोत्सवासाठी ढोल पथके सज्ज होत आहे. त्यासाठी शहरात प्रथम आज हिंदवी शौर्य वाद्यपथकचा सरावास प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते ढोल पूजन करून करण्यात आला. यावेळी श्रीढोलपथक पुणे, संस्थापक, अध्यक्ष व हिंदवी शौर्य वाद्यपथक प्रमुख सुनील करांदे यांच्यासह सर्व वादक व त्यांचे मित्र परिवार व नागरिक उपस्थित होते. नंतर ढोल पथक सराव प्रारंभ करण्यात आला.
आमदार जगताप म्हणाले, ढोल ताशा पथक आपली संस्कृती आहे. ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक रचनेचा अविभाज्य भाग आह. ऐतिहासिकदृष्ट्या ढोल ताशाचा उगम पारंपारिक लोकसंगीत आणि नृत्य प्रकारांमध्ये होतो. गणेशोत्सव आपला उत्सव आहे. जो लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी सुरू केला.

सुरुवातीला सण आणि उत्सवांमध्ये संवादाचे साधन म्हणून वापरला जाणारा ढोल ताशाचा ताल लोकांना एकत्र आणणारी एक शक्ती म्हणून काम करत आहे. या तालबद्ध समूहाला सध्या महत्त्व प्राप्त झाले, जिथे ते मिरवणुकांचा अविभाज्य भाग बनले आहे.
विशेषतः गणेश उत्सवाचा मूर्तीचे स्वागत आणि निरोप देण्यासाठी आपण वापरतो व आता अनेक ठिकाणाहून पथकांनी मागणी येत आहे. ढोल ताशा महाराष्ट्राच्या आत्मा बनला आहे. जो राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे, असेही ते म्हणाले.