पाथर्डी- गेल्या काही दिवसापासून शहरांमध्ये भटक्या गाई व मोकाट वळुंच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वळुंच्या झुंजीमुळे अनेकजण जखमी होत असून वाहनांचे देखील यामुळे मोठे नुकसान होत आहे. याची दखल घेऊन नगरपरिषदेने गाय व वळूना पकडायचा पिंजरा आणला असून सार्वजनिक ठिकाणी आपल्या जनावरांना बेजबाबदारपणे सोडणाऱ्या मालकांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी दिली.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी म्हटले आहे की, नगरपरिषद हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या गायी, बैल व इतर गुरांपैकी बरीच जनावरे ही स्वमालकीचे आहेत. तरी महाराष्ट्र नगरपरिषद औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम २९१ नुसार रस्त्यावर गुरे, जनावरे सोडल्याबद्दल किंवा सार्वजनिक मालमत्तेवरील अप प्रवेशाबद्दल पहिल्या अपराधाबद्दल ३ हजार दंड व दुसत्या तसेच नंतरच्या अपराधाबद्दल ६ महिने कैद होऊ शकते.

किंवा ५ हजार रुपये दंडाची शिक्षेस तरतूद आहे. नगरपरिषद अधिनियम १९६५ मधील २९४ कलमनुसार नगरपालिका क्षेत्रात व त्याच्या कोणत्याही भागात विनापरवानगी गायी, गुरे, जनावरे पाळल्यामुळे लोकांना उपद्रव व त्रास होत असल्याचे आढळून आल्यास त्यास दंड व गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.
तरी शहरात ३ दिवसात ज्या नागरिकांच्या मालकीची जनावरे गायी, गुरे यांचा बंदोवस्त करण्यात यावा. अन्यया नियमानुसार योग्य ती कारवाई करुन पावर्डी नगरपरिषदे मार्फत मोकाट जनावरे धरुन गोशाळेत पाठविली जाणार आहेत. जनावरे पकडतांना पाथर्डी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याकडे आयकार्ड राहतील. सदरील कर्मचाऱ्यांना मोकाट जनावरे पकडतांना गोरक्षकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी लांडगे यांनी केले आहे.
नगरपरिषदेच्यावतीने भटक्या गाईंना पकडण्याच्या मोहीमेचे आम्ही स्वागत करतो. यामुळे भटक्या व निराधार गाईंना गोशाळेचा हक्काचा आधार मिळेल. चारा, पाणी सह कत्तली पासून संरक्षण देखील यामुळे मिळणार आहे. या मोहिमेसाठी गोरक्षक पूर्णपणे सहकार्य करतील. – मुकुंद गर्जे, गोरक्षक पाथर्डी