श्रीरामपूरमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यास प्रशासनाची टाळाटाळ, आत्मदहन करण्याचा रिपाईंचे सरचिटणीस काळे यांचा इशारा

Published on -

श्रीरामपूर- शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. परंतू, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ करून विलंब करण्यात येत आहे. येत्या दहा दिवसांत रेल्वे स्टेशनजवळील जागेत डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या कामास सुरुवात करावी, अन्यथा नगरपालिकेसमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस मनोज काळे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर रेल्वे स्टेशनजवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. हा पुतळा जवळपासून ६० ते ७० वर्षापूर्वीचा काळेंचा इशारा आहे. त्या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसवावा, अशी दलित समाजाची बऱ्याच वर्षापासून मागणी आहे. याप्रश्नी आरपीआयच्यावतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता.

तसेच उपोषण ही करण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. परंतु, आजपर्यंत समाजाला फक्त आश्वासन देवून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पुतळा बसविण्यासाठीच्या प्रशासकीय मंजूरीसाठी पाठपुरावा करण्यात आला. कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. परंतु, बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित पुतळा बसविण्यास विलंब होत आहे.

श्रीरामपूर मतदारसंघातील लोकप्रतिनिधी याप्रश्नी गप्प आहेत. याप्रश्नी नगरपालिकेने गांभीर्याने विचार करून समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम दहा दिवसाच्या आत सुरू करावे, अन्यथा अकराव्या दिवशी कोणतीही पूर्वसूचना न देता श्रीरामपूर नगरपालिकेसमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस मनोज काळे यांना पत्रकात दिला आहे.

सदर पत्रकावर समाधान नरवडे, अक्षय पवार, श्रृशी गोरडे, निलेश सोनवणे, अतुल काळे, विनाकय बोराडे, भारत संघवी, पप्पू भोसले, राहुल गाडे, रोहित भास्कर, अकबर पठाण, यशवंत गायकवाड, प्रशांत साळवे, अनिल मोरगे, अविनाश अमोलिक, सम्राट झिने, संजय साबळे आदींच्या सह्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!