श्रीरामपूर शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या संदर्भात आमदार हेमंत ओगले यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

Published on -

श्रीरामपूर- शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेसाठी रेखांकनाचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहे.

शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागे संदर्भात आमदार हेमंत ओगले यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात काल मंगळवारी बैठक घेतली.

यावेळी ते बोलत होते. सदर बैठकीकरिता माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, मार्केट कमिटीचे सभापती सुधीर नवले, मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप, वन विभाग आणि भूमी अभिलेख विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार ओगले म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा गेल्या अनेक वर्षांपासून तयार आहे. फक्त वनविभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्राकरिता सदर विषय प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी तातडीने वन आणि भूमिअभिलेख विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. याबाबत डी फॉरेस्ट नोटिफिकेशन नुसार वनविभाग आणि भूमी अभिलेख यांनी जागेवर प्रत्यक्षात पाहणी करुन त्याबाबतचे नकाशे तयार करण्याचे आदेश दिले. याबाबत दोन्ही विभागांना पत्र देण्याविषयी उपजिल्हाधिकारी, महसूल विभागाला आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप मगर, दत्तनगरचे सरपंच प्रेमचंद कुंकूलोळ, माजी सरपंच सुनील शिरसाठ, नगरसेवक कलीम कुरेशी, शंकरराव गायकवाड, युवक काँग्रेसचे सचिव प्रशांत ओगले, निलेश नागले, अशोक लोंढे, सुहास राठोड, मोहन आव्हाड, सुनील मगर, रितेश एडके, मच्छिद्र ढोकणे, मनोज काळे, वैभव पंडित, सुरेश ठुबे, किरण खंडागळे, सुरेश बनसोडे, सोमनाथ पटाईत, अतुल काळे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!