अहिल्यानगर जिल्ह्यात १५० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमानिमित्त महावितरणची प्रभावी अंमलबजावणी, अनेक तक्रारीचे निवारण

Published on -

अहिल्यानगर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतिमान प्रशासनासाठी १५० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या अहिल्यानगर मंडलाने नवीन वीज जोडणी, नावात बदल, पत्यात दुरुस्ती, वीजबिल बाबत तक्रार निवारण आणि वीजपुरवठा खंडित तक्रार निवारण अशा प्रकारची विविध ग्राहकांची कामे गतीने पूर्ण केली. गतिमान सेवेसोबत तक्रारींचे जलद निवारण करीत ही मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी तसेच विविध विभागातील कामांना चालना देण्यासाठी व कामे तळागळापर्यंत व अधिक लोकाभिमुख करण्यासाठी हा कार्यक्रम आहे. महावितरणच्या कोकण प्रादेशिक परिक्षेत्राचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांनी या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता रामेशकुमार पवार यांनी गतिमान अंमलबजावणी केली.

विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित १५० दिवसांचा कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यानुसार महावितरण तक्रारींचे निवारण करण्याबरोबरच ग्राहकांना गतिमान सेवा देण्यासाठी कार्यरत आहे.

अशी राबविली मोहीम दि.२ मे २०२५ पासून सुरु झालेल्या या १५० दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रमात महावितरणच्या अहिल्यानगर मंडलाने ८,८९७ ग्राहकांना नवीन वीज जोडणी दिली आहे. १,९८२ ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आले आहेत. २४४ ग्राहकांच्या पत्यात दुरुस्ती करण्यात आली आहेत. तर १०,११० ग्राहकांच्या वीज देयक बाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहेत. याशिवाय, वीज पुरवठा खंडित संदर्भातील ८,९०७ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!