करंजी- श्रद्धा आणि सबुरी या न्यायाने आमची वाटचाल सुरू असल्याने डॉ. सुजय विखे यांनाही कोर्टातून न्याय मिळेल, डॉ. सुजय यांचा पराभव जरी झाला असला तरी आम्ही मनाने खचलेलो नाही.’ घार फिरते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी’ या उक्तीप्रमाणे विखे परिवाराचे नगर दक्षिणेवर लक्ष आहे. अशा शब्दांत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी नगर लोकसभा मतदारसंघातील आगामी राजकीय वाटचालीकडे लक्ष वेधले.
माजी सभापती आणि तिसगावचे ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे पाटील यांच्या ७५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

लवांडे व विखे परिवाराचे गेल्या ४० वर्षांपासून राजकीय संबंध असून, तालुक्यातील निवडक प्रमुख कार्यकत्यापैकी विखे समर्थक म्हणून लवांडे यांच्याकडे बघितले जाते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, माजी सभापती मिर्झा मणियार, वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक राहुल राजळे, येळीचे सरपंच संजय बडे, जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक खेडकर, चेअरमन पुरुषोत्तम आठरे, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कुशल भापसे, बाजार समितीचे संचालक वैभव खलाटे, चेअरमन धीरज मैड, भाऊसाहेब घोरपडे सर, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील परदेशी, सुरेश चव्हाण, अमोल वाघ, अजय पाठक, उद्योजक दिलीप गांधी होेते.
तसेत शंकरराव उंडाळे, संतोष छाजेड, सदाशिव मैड, प्रमोद बेद्रे, गणेश कंगे, सुनील शिंगवी, सरपंच मुनिफा शेख, उपसरपंच पंकज मगर, चेअरमन भारत गारुडकर युवानेते भाऊसाहेब लंवाडे, भैया बोरुडे, सचिन नेहूल, नवनाथ आरोळे, किरण गजें, गणेश शिदोरे, सुनील पुंड, राजेंद्र राठोड, मधुकर वांढेकर, प्रणील सावंत, सचिन साळवे, गीताराम वाघ, शरद खंडागळे, यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती उद्धव वाघ होते. या वेळी विविध वक्त्यांनी लवांडे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा भाषणतून आढावा घेतला.
या वेळी बोलताना शालिनीताई विखे म्हणाल्या, मागील पाच वर्षांमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कित्येक वर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांची सोडवणूक केली. अनेक विकास कामे केली. सर्वसामान्य कार्यकत्यांना न्याय दिला. अनेक वर्षांचा विकासकामांचा अनुशेष भरून काढण्याचे काम केले. असे असूनही लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी पराभवाने खचून जाणारे विखे कुटुंब नाही. साईबाबा आम्हाला आशीर्वाद आणि न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत.
आम्ही न्यायालयाकडे दाद मागितली आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. लोकनेते पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांच्याप्रमाणेच डॉ. सुजयलादेखील न्यायदेवतेकडून न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत उत्तरे प्रमाणेच नगर दक्षिणेकडेदेखील विखे कुटुंबाचे लक्ष असून, या भागातील प्रश्न, विविध अडचणी सोडवण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील निश्चितपणे सहकार्य करतील, दुष्काळी भागाला न्याय देण्यासाठी काशिनाथ लवांडे यांनी सातत्याने संघर्ष केला. विखे पाटील हाच राजकीय पक्ष समजून ते कायम विखे कुटुंबाबरोबर प्रामाणिक राहिले. तिसगावच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे युवानेते अक्षय कर्डिले महणाले, तालुक्यातील निष्कलंक आणि निर्भीड व्यक्तिमत्त्व म्हणून लवांडे पाटील यांचा परिचय असून, राजकारणात त्यांनी प्रस्थापितांविरोधात सतत संघर्ष केला.
सत्ता, पदे अशा गोष्टीला महत्त्व न देता सतत विकासकामांवर आवाज उठविला, लवांडे पाटील यांचे कार्य दोन पिढ्यांना मार्गदर्शक ठरले असून, तालुक्याच्या राजकीय वर्तुळातील प्रमुख शक्ती केंद्र म्हणून त्यांच्याकडे बघितले जात असल्याचे कर्डिले महणाले. प्रास्ताविक मुख्तार शेख सर यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक नेते कल्याण लवांडे यांनी केले. आभार भाऊसाहेब घोरपडे सर यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिष्टचिंतन सोहळा पार पडताच वरूणराज्याने तिसगावमध्ये जोरदार हजेरी लावल्याने बळीराजादेखील सुखावला आहे.