श्रीरामपूर- श्रीरामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याचा स्नेह मेळावा अंतरवली (ता. नेवासा) येथील कानडे कुटुंबाच्या शैक्षणिक संकुलामध्ये नुकताच उत्साहात पार पडला. या बैठकीसाठी सर्व प्रमुख पदाधिकारी व मतदार संघातील श्रीरामपूर – देवळाली शहरासह प्रत्येक गावचे प्रमुख सहकारी उपस्थित होते. या मेळाव्याला माजी आमदार लहु कानडे यांनी संबोधित केले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही निराश न होता आपण सर्वजण कार्यरत असल्याबद्दल व पक्षाशी एकनिष्ठ असल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
आज पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जन्मदिवस आहे. पक्षाने आपल्या नेत्याचा जन्मदिवस २२ ते ३० जुलै असा सप्ताह भर विजय संकल्प म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गाव व शहरातील प्रत्येक वार्डात आज आपले नेते ना. अजित पवार यांचे फोटो असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्वागत फलक लावायचे व गावात कार्यक्रम घेवून गावातील व वार्डातील एक महिला कार्यकर्ती व युवक कार्यकर्ता यांना पुस्तक भेट देऊन सत्कार करण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सुचवले.

यावेळी पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार कानडे यांनी स्पष्ट केले की, गावोगावची संघटना मजबूत करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूका आपापल्या सर्व ताकतीने लढावयायचे आहे. आपण सत्यधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याने आपल्यावर प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेची कामे आपण निश्चितच करू शकतो. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने काम करावे. आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी सोबत आमचे कुटुंब विशेषतः अशोक कानडे सातत्याने राहतील. त्यांनीही जबाबदारी घेण्याचे मान्य केले आहे.
याप्रसंगी अरुण नाईक, अमृतकाका धुमाळ, अशोकराव भोसले, कार्लस साठे, निलेश भालेराव, राजेंद्र कोकणे आदीची भाषणे झाली. यावेळी माजी नगरसेवक राजेश अलग, रवींद्र गुलाटी, बाबासाहेब खोसरे, मुक्तार शहा, मेहबूब कुरेशी, सागर कुऱ्हाडे, सचिन जगताप, दीपक निंबाळकर, आबा पवार, सागर मुठे, सतीश बोर्डे, नारायण टेकाळे, बाबाजी ढोकचौळे, बाबासाहेब घोंगडे, गाजाबापू फोपसे, नारायण कणसे, अविनाश पवार, बाबासाहेब कोळसे, राधाकृष्ण तांबे, आदिनाथ पवार, दीपक कदम, अजिंक्य उंडे, अजय खिलारी, अनिल बिडे, अक्षय नाईक, आशिष शिंदे, चांगदेव देवराय, मधु कांबळे आदी मान्यवरांसह अंकुश कानडे, अशोक कानडे व सर्व कानडे कुटुंबीय उपस्थित होते.