वाळकी- नगर तालुक्यातील वाळकी येथील शेतकरी बाप्पू उर्फ अशोक पाटीलबा निमसे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी दि.१५ जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून बाप्पू निमसे हे कर्जाच्या बोजाखाली वावरत होते. कर्जाला कंटाळून आत्महत्या करावी, असे वक्तव्य ते सातत्याने इतरांकडे बोलताना व्यक्त करत होते. अखेर मंगळवारी म्हणजे दि.१५ जुलै रोजी त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली.

ते आदर्श शेतकरी म्हणून वावरत होते. बाप्पू निमसे यांच्या पाठीमागे एक मुलगा गोविंदा, पत्नी, बंधू शिवाजी, बहिण, नातू असा मोठा परिवार आहे.
मंगळवारी दुपारी वाळकी येथील अमरधाम स्मशानभूमी येथे त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान बापू निमसे यांच्या अकाली निधनाने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते अत्यंत मनमिळावू व कष्टाळू स्वभावाचे होते.