अहिल्यानगर- जिल्ह्यामध्ये खरीप २०२५ दरम्यान सरासरी ९४ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये काही प्रमुख पिके आहेत. त्यात साधारणपणे कापूस दीड लाख हेक्टर, सोयाबीन दीड लाख हेक्टर तसेच सध्या मका पिकाखालील क्षेत्र देखील वाढत आहे. त्यात ९० हजार हेक्टर एक क्षेत्र आहे. बाजरी, मूग, तूर, उडीद यासारख्या पिकांची देखील पेरणी आपल्याकडे झालेली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून खरीप पीक विम्याचे ९८ हजार अर्ज आले आहेत.
अकोले तालुक्यात दुबार पेरणीची प्रक्रिया सुरू असून साधारणपणे १५ हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर याची लागवड होईल, असा अंदाज आहे. अशा पद्धतीने एकंदरीत सर्व पिकांची परिस्थिती आहे. परंतु मागील दहा ते पंधरा दिवसापासून पर्जन्यमान खूपच कमी झाल्याने पिके कोमेजू लागले आहेत. याला अनुसरूनच कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते, की खरीप हंगामातील जवळपास दहा प्रकारचे पिके पिक विमा योजनेअंतर्गत संरक्षित केलेले आहेत.

यात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस यासारख्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पिकांचा विमा उतरवणे गरजेचे आहे. ३१ जुलैपूर्वी जवळच्या सीएससी सेंटर राष्ट्रीयकृत बँक या ठिकाणी पिक विमा भरता येईल. यामध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास गाव पातळीवर कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा,
३१ जुलै या शेवटच्या तारखेची वाट न बघता लवकरात लवकर पीक विमा योजनेची फॉर्म भरा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या वतीने करण्यात आले. एकूण वीमा संरक्षित रक्कमेच्या २ टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.