शेतकऱ्यांनो कालव्याचे पाणी काळजीपूर्वक वापरा, अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या; आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सूचना

Published on -

नेवासा- मुळा उजवा कालव्याचे आवर्तन सुरू असताना कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त सिंचन झाले पाहिजे. यासाठी पाणी व्यवस्थित वापरणे व त्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी अधिकाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांनी देखील घ्यावी, अशी सूचना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केली.

मुळा पाटबंधारे विभागाच्या चिलेखनवाडी उपविभाग अंतर्गत कुकाणा सिंचन शाखा क्रमांक १ च्या नूतन कार्यालयीन इमारतीचे लोकार्पण आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते काल रविवारी झाला. त्यावेळी आ. लंघे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, सचिन देसरडा, अब्दुल शेख, अंकुश काळे, डॉ. बाळासाहेब कोलते, दिनकरराव गर्जे, अमोल अभंग, सोमनाथ कचरे, विलास देशमुख, शंकर भारस्कर, घोडेगाव उपविभागाचे उपविभागीय अभियंता संदीप पवार उपस्थित होते.

याप्रसंगी आ. लंघे पुढे म्हणाले की, मुळा पाटबंधारे विभागाच्या परिपूर्ण कार्यालयाचे लोकार्पण आज झाले. आपण बघतो की मुळा पाटबंधारे कर्मचाऱ्यांच्या वसाहती फार जुन्या होऊन त्यांची दुर्दशा झालेली आहे. जे अधिकारी काम करतात, त्यांना कार्यालय देखील व्यवस्थित नव्हते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून कुकाणा व शिरसगाव येथे कार्यालये बांधण्यात आली. कुकाणा येथील कार्यालय अतिशय सुसज्ज, छोटे पण माहितीने परिपूर्ण आहे. कार्यालयात लावलेल्या माहिती फलकामुळे शेतकऱ्यांना माहिती मिळेल.

पूर्वी थेट सिंचन होत होते. परंतु पाणी वापर संस्था चालु झाल्यानंतर काही अडचणी आल्या. येत असलेल्या अडचणीवर जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याशी चर्चा झालेली आहे.
यात सुसूत्रता कशी आणता येईल, यावर भर देण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मागचे तीनही रोटेशन व्यवस्थित घेता आले. तसेच कार्यकारी अभियंता सायली पाटील व त्यांच्या टीमने अतिशय चांगले नियोजन केले.

यावेळी सुखदेव फुलारी, कुकाणाचे माजी सरपंच एकनाथराव कावरे, दौलतराव देशमुख, भाऊसाहेब फोलाणे, बाळासाहेब कचरे, ललित भंडारी, लहु खाटीक, बाळासाहेब म्हसरूप, अशोक भुमकर, शाखाधिकारी बिरबल दरवडे, जितेंद्र कावले, प्रदीप खर्से, अतुल गायकवाड, कालवा निरीक्षक श्रीकांत करंजे, नितीन लांडे, रावण ससाणे, पोपट दरंदले, सुधीर चव्हाण, विकास घोक्षे, बापू काळे, युनुस शेख, सलमान शेख, नवनाथ शिरसाठ, शिपाली चव्हाण, मोजणीदार दिपक राहिंज, दप्तर कारकून दिपक कचरे, अभिजित देशमुख, वरिष्ठ लिपिक सुनील तुपे, फिरोज पठाण, अनुरेखक वैभव पावडे, कर्मचारी समीर पठाण, सुभाष गायकवाड, महेश ठुबे, पोपट सरोदे, अनिल कर्डीले, गवाजी शिरसाठ, शांताबाई म्हस्के आदी उपस्थित होते.

चिलेखनवाडी उपविभागाचे उपविभागीय अभियंता स्वप्नील देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संतोष राऊत यांनी सूत्रसंचालन केले. तर नितीन लांडे यांनी आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!