पारनेर- गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या पारनेर तालुक्यातील गट आणि गणाच्या रचनेमध्ये पाच गावांची गणांमध्ये अदलाबदल करण्यात आली असून, उर्वरित रचना पूर्वीप्रमाणेच असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसारः पूर्वी सुपे गटामध्ये असलेले शहाजापूर हे गाव ढवळपुरी गटात समाविष्ट करण्यात आले आहे. पूर्वी झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शहाजापूर ढवळपुरी गटातून सुपे गटात समाविष्ट करण्यात आले होते.

भौगोलिक सलगता पाहता हे गाव मागील वेळेस सुपे गटात समाविष्ट करण्यात आले होते. यंदा पुन्हा शहाजापूरला ढवळपुरी गटात समाविष्ट करण्यात येऊन भौगोलिक सलगतेला हरताळ फासण्यात आला आहे.
नव्या रचनेनुसार पूर्वी टाकळी ढोकेश्वर गणात असलेले पिंपरीपठार गाव कान्हरपठार गणात, निघोज गणातील दरोडी, कान्हुरपठार गणात तर निघोज गणातील वडनेर बुद्रुक गाव अळकुटी गणात, जवळा गणातील पठारवाडी हे गाव निघोज गणात समाविष्ट करण्यात आले आहेजिल्हा परिषदेच्या टाकळी ढोकेश्वर गटामध्ये कर्जुलेहर्या व टाकळी ढोकेश्वर ढवळपुरी गटामध्ये, ढवळपुरी व भाळवणी, कान्हरपठार गटामध्ये, कान्हूरपठार व जवळा, अळकुटी गटामध्ये, अळकुटी व निघोज, सुपा गटामध्ये सुपा व वाडेगव्हाण या गणांचा समावेश आहे.
पंचायत समिती गण व त्यात समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे कर्जुलेहर्या कर्जुलेहयां, पिंपळगाव रोठा, नांदुरपठार, सावरगाव, पोखरी, काताळवेढा, पळसपूर, म्हसोबा झाप, वारणवाडी, कारेगाव, गारगुंडी, कासारे. टाकळी ढोकेश्वर टाकळी ढोकेश्वर, बडगाव सावताळ, गाजदीपूर, वासुंदे, ढोकी, देसवडे, खडकवाडी, मांडवे खुर्द, भोंद्रे, काकणेवाडी, तिखोल. ढवळपुरी ढवळपुरी, पळशी, वनकुटे, तास, धोत्रे बुद्रुक, धोत्रे खुर्द, भनगडेवाडी, हिवरेकोरडा, काळकूप. भाळवणी भाळवणी, माळकूप, पाडीळीतर्फे कान्हूर, वडगाव आमली, भांडगाव, जामगाव, शहांजापूर, सारोळा आडवाई, दैठणे गुंजाळ, लोणीहवेली
बुद्रुक, धोत्रे खुर्द, भनगडेवाडी, हिवरेकोरडा, काळकूप. भाळवणी – भाळवणी, माळकूप, पाडीळीतर्फे कान्हूर, वडगाव आमली, भांडगाव, जामगाव, शहांजापूर, सारोळा आडवाई, दैठणे गुंजाळ, लोणीहवेली, गोरेगाव, डिकसळ. कान्हूरपठार – कान्हूरपठार, दरोडी, पिंप्रीपठार, विरोली, हत्तलखिंडी, पुणेवाडी, पिंपळगावतुर्क, वेसदरे, वडगावदर्या, पाडळीदर्या, अक्कलवाडी, करंदी, किन्ही, बहिरोबावाडी, वडझिरे, शेरीकोलदरा, जाधववाडी, बाभुळवाडे. जवळा – जवळा, सांगवीसुर्या, गांजीभोयरे, देविभोयरे, चिंचोली, पिंप्रीजलसेन, वडुले, सिध्देश्वरवाडी, पिंपळनेर, पानोली. अळकुटी – अळकुटी, वडनेरबुद्रुक, चोंभूत, रेनवडी, शिरापुर, शेरी कासारे, कळस, पाडळीआळे, रांधे, पाबळ, लोणीमावळा, म्हस्केवाडी, गारखिंडी.
निघोज गण – निघोज, मोरवाडी, ढवणवाडी, वडगांव गुंड, शिरसुले, पठारवाडी, गुणोरे, गाडीलगाव, कोहोकडी, म्हसे खुर्द, राळेगणथेरपाळ, हकीगतपूर, माजमपूर. वाडेगव्हाण – राळेगणसिध्दी, वाडेगव्हाण, कुरूंद, यादववाडी, नारायणगव्हाण, पाडळीरांजणगाव, कळमकरवाडी, पळवे बुद्रुक, पळवे खुर्द, कडूस, मावळेवाडी, जातेगाव, म्हसणे, सुलतानपूर, वडनेर हवेली, गटेवाडी, घाणेगाव, वाघुंडे बुद्रुक, वाघुंडे खुर्द. सुपे – सुपे, हंगे, मुंगशी, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, पिंप्रीगवळी, रांजणगावमशिद, रूईछत्रपती, आपधुप, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा.