समाजात आजही मुलगी ‘नकोशी’च ; महाराष्ट्रातील स्थिती चिंता निर्माण करणारी ? एक ‘ हजार मुलांमागे अवघ्या ९१५ मुली

Published on -

अहिल्यानगर : मुलगा म्हणजे वंशाचा दिवा ही मानसिकता कायम असल्याने आजही अनेक कळ्यांना गर्भातच खुडण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. परिणामी मुलींची संख्या कमी झाल्याने अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या. त्यातून समाज धडा घ्यायला तयार नाही. आजही मुलगाच हवा, हा अनेकांचा अट्टाहास कायम आहे. त्यामुळे राज्यात नव्हे तर देशात मागील काही वर्षांत मुलींची घटणारी संख्या ही मोठी चिंतेची बाब झालेली आहे . आज मितीला महाराष्ट्रातील १००० मुलांच्या पाठीमागे अवघ्या ९१५ मुली आहेत. ही संख्या दिवसानुदिवस घटत चालली आहे ही सर्वात चिंताजनक बाब आहे .

आपल्या राज्यात देखील अशीच स्थिती आहे. महाराष्ट्रात २०१४-१५ मध्ये (जन्माच्यावेळी) लिंग गुणोत्तर एक ‘ हजार मुलांमागे ९२० मुली असे होते. त्यानंतर त्यात सुधारणा होऊन २०२०-२१ मध्ये ही संख्या ९४० अशी दिलासा देणारी झाली. मात्र त्यात पुन्हा घट होत २०२१-२२ मध्ये ही संख्या ९३३ अशी कमी झाल्याची नोंदविली गेली. वर्ष २०२२-२३ मध्ये ही संख्या ९३२ झाली. आता २०२३-२४ मध्ये नबजात बालकांच्या जन्माच्या वेळीचे लिंग गुणोत्तराचे प्रमाण हे ९१५ एवढे आहे. २०१९९ च्याजनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर ९२९ एवढे होते. त्यानुसार लिंग गुणोत्तरात देशात महाराष्ट्राचा २२ क्रमांक होता.

यात सर्वात गंभीर बाब म्हणजे मुलगाच हवा या हव्यासापोटी अनेक कळ्यांना गर्भातच खुडण्यात आले . परिणामी आज महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मोठ्या संख्यने मुलींची संख्या कमी आहे. कमी झालेल्या मुलींच्या संख्येने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आजही अनेक तरुणांचे विवाहाचे वय झाले आहे मात्र त्यांना लग्नासाठी मुलगीच मिळत नाही तर अनेक तरुणांचे वय होऊन गेले मात्र त्यांचे लग्नच होत नसल्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

लोकसंख्येत दर हजार पुरुषांमागे असलेल्या स्त्रियांच्या प्रमाणाला लिंग गुणोत्तर म्हटले जाते. २०११ च्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४०स्त्रिया आहेत म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे. मात्र, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या दो, हम दो हमारा एक’, लहान कुटुंब या संस्कृतीत मुलगा हवाच या अट्टहासामुळे आज समाजाची मानसिकता बदलली आहे. याचा परिणाम लिंग गुणोत्तरावर झालेला असून याचा परिणाम देशांत अनेक राज्यांत लिंग गुणोत्तर बिघडल्याने
तेथे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत.

लिंग गुणोत्तराचे प्रमाण अशाच प्रकारे घटत राहिल्यास समाजाचा समतोल बिघडू शकतो. स्त्रीभूणहत्या मोठ्या प्रमाणावर घडू लागल्यानंतर काही वर्षांनी लग्नासाठी मुलांना मुली न मिळणे हा एक मोठा परिणाम दिसून येतो. विशेष म्हणजे या समस्येचेही स्वरूप धर्म,समाजानुसार वेगवेगळे आहे. मात्र, आज बहुतांश समाजात मुलींची संख्या कमी झाल्याने मुलांचे लग्न होणे अवघड झाले आहे. मुलांचे लग्न न होणे ही आज भीषण समस्या आहे. त्याचा समाजातील अनेक घटकांवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे .

सन १९७० पूर्वी दर १०५ मुलांमागे १०० मुली असे असलेले लिंग गुणोत्तर १९९० पर्यंत प्रति ११० मुलांमागे १०० मुली असे झाले. मुलींची कमी होत असलेली संख्या पाहता सरकारने गर्भलिंग निदान करण्यास कठोर कायदा असला तरी आजही अनेक भागांत छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान केले जात आहे. असे करणारे अनेक जणांचे रॅकेट आतापर्यंत उघड झालेले आहे. मात्र त्यात फारसा बदल झालेला दिसत नसल्याने या पुढील काळात मुलांच्या विवाहाचा सर्वात गंभीर प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!