शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच होणार, आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Updated on -

Ahilyanagar News : चोंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ४३० खाटांचे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मंजूर झाले. पण शासकीय महाविद्यालय शहराच्या मुख्यालयात न होता अन्य होण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्यामुळे शासकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच व्हावे, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधान भवनात भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून आमदार जगताप यांना आश्वासन दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी शासकीय महाविद्यालयात मंजूर झाल्यानंतर ते महाविद्यालयात जिल्ह्यातील अन्य ठिकाणी करण्यासासंदर्भात हालचाली झाल्या होत्या. तेव्हापासून आमदार संग्राम जगताप यांनी शासकीय विद्याकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहरातच व्हावे, यासाठी आग्रही होत आणि त्यासाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला.

मुंबई येथे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन शासकीय महाविद्यालयासंदर्भात निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. हे महाविद्यालय शहरातील मध्यवर्ती ठिकाणी होणे गरजेचे आहे. जेणेकरुन शहरासह जिह्यातील सर्व नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सोयीचे होईल.

या वैद्यकीय महाविद्यालयासाठी अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या नालेगाव परिसरातील कृषी विभागाची २५ एकर जमीन उपलब्ध आहे. सध्या ही जागा वापरात नसून त्या जागी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्यास सर्व नागरिकांची चांगली सोय होईल.

अहिल्यानगर जिल्ह्यासह सोलापूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यांना जोडणारा हा मध्यवर्ती भाग आहे. त्यामुळे अहिल्यानगर सह अन्य जिल्ह्यातील रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे.

अहिल्यानगर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालया व्हावे, अशी जिल्हावासियांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. त्याला मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुर्त स्वरूप दिले आहे. अहिल्यानगर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्याल झाल्यानंतर अहिल्यनगरसह मराठवाडा, सोलापूर येथील रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. – आमदार संग्राम जगताप, अहिल्यानगर

जागा पाहणीचे आदेश द्यावेत
शासकीय महाविद्यालयायासाठी सुमारे ३५ एकर जागेची आवश्यकता आहे. शासनाकडून जागा शोधण्याचे काम सुरू आहे. अहिल्यानगर शहरालगत नालेगाव हद्दीत शासनाच्या कृषी विभागाची २५ एकर जागा आहे. त्या जागेत शासकीय महाविद्यालय उभारल्यास अहिल्यानगर जिल्ह्याच्या व शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे राहणार आहे. त्या जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात संबंधित विभागाला आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!