नेवासा- आमदार विठ्ठलराव लंघे यांनी नव्याने सुरू केलेल्या येथील जनसंपर्क कार्यालयास राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.

यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी ना. विखे पाटील यांचे स्वागत करून सत्कार केला. जनसंपर्क कार्यालय हे लोकप्रतिनिधी आणि जनतेतील संवादाचा एक महत्वाचा दुवा असून या ठिकाणी नागरिकांच्या अडचणी, समस्या यावर मार्गदर्शन मदत व उपाययोजना केल्या जात असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यालयीन कामकाजाची माहिती घेतली व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, बाळासाहेब भदगले, भाजपाचे नेते ऋषिकेश शेटे, बाळासाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित होते.