शिर्डी- येथील गुरुपौर्णिमा उत्सवास काल बुधवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
काल बुधवारी उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा घेऊन तर साईआश्रम भक्तनिवास प्रभारी अधीक्षक विजय वाणी व प्रभारी उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला.

याप्रसंगी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, प्रभारी जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पूजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रथम अध्याय, साईआश्रम भक्तनिवास प्रभारी अधिक्षक विजय वाणी यांनी द्वितीय अध्याय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी तृतीय अध्याय, प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी चौथा अध्याय व प्रभारी प्रशासकिय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला.