अहिल्यानगर- शहरातील प्रेमदान हाडको परिसरात मोटारीतून गुटखा विक्री आणलेल्या एकास तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोटारीसह मोटारकारसह ५ लाख १२ हजार ४३६ मुद्देमाल जप्त केला. अनिकेत पोपट दळवी (वय २५, रा. न्यू प्रेमदान हाडको, सावेडी, ता जि अहिल्यानगर) असे ताब्यात घेतल्याचे नाव आहे.
तोफखा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना २२ जुलै रोजी माहिती मिळाली की, न्यू प्रेमदान हाडको, सावेडी येथे एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री करणाचे उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगून आहे. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी प्रेमदान हाडको परिसरात सापळा लावला असता संशयित कार दिसून आले.

पोलिसांनी कारधमील अनिकेत पोपट दळवी यास ताबत घेऊन त्याच्या कारची झडती घेतली. कारमधून केसर युक्त विमल पान मसाल्याच्या १३ गोण्या, प्रत्येक गोणीमध्ये २२ पुडे, सुगंधीत तंबाखू व मोटारकार असा पाच लाख १२ हजार ४३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस कॉन्स्टेबल कपिल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलिस हेडकॉन्स्टेबल अब्दुलकादर इनामदार, बापुसाहेब गोरे, सुधीर खाडे, सुरज वाबळे, सुजय हिवाळे, सतिष त्रिभुवन, बाळासाहेब भापसे, कपिल गायकवाड यांच्या पथकाने केली.