संगमनेर- वीर जवान मेजर संदीप घोडेकर यांच्या स्मृती कायमस्वरूपी जागृत राहाव्यात म्हणून हेल्थ क्लब, घोडेकर मळा रोडला मेजर संदीप घोडेकर यांचे नाव देऊन हेल्थ क्लब रोड प्रवेशद्वाराजवळ कमान उभारावी, अशी मागणी घोडेकर मळा मित्र परिवाराने आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आहे.
त्यावर योग्य तो निर्णय घेऊ, असा विश्वास आ. अमोल खताळ यांनी घोडेकर मित्रपरिवाराला दिला.दिल्ली येथे केंद्रीय गुप्तचर विभागात आयबीमध्ये कार्यरत असताना संगमनेर येथील भूमिपुत्र वीर जवान मेजर संदीप किसन घोडेकर यांचे निधन झाले.

मुंबई येथून आल्यानंतर आ. अमोल खताळ यांनी घोडेकर मळा येथील मेजर घोडेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे बंधू गणेश घोडेकर यांच्यासह कुटुंबियांचे सांत्वन केले. मेजर संदीप घोडेकर यांनी छत्तीसगड सारख्या नक्षलग्रस्त भागात अनेक वर्षे सीआरपीएफमध्ये कार्यरत राहून देशसेवा केलेली आहे.
त्यांच्या शौर्याचा आणि कर्तव्य निष्ठेचा आम्हा संगमनेरकरांना अभिमान आहे. अचानक त्यांचे आपल्यातून निघून जाणे हे अत्यंत दुःखद आहे. मी आणि संपूर्ण संगमनेरक घोडेकर कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहणार आहोत, अशा भावना आ. खताळ यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे गोपाल पडतानी, भाजपच्या शहराध्यक्ष पायल ताजने, माजी नगरसेविका ज्योती भोर, शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, राहुल भोईर, संदिप बाळसराफ, सुनील म्हसे, दिलीप म्हसे, डॉ. बाळासाहेब म्हस्के, भगवान घोडेकर, सदाशिव घोडेकर, बाळासाहेब ढोले, दीपक म्हाळस, दीपक घोडेकर, बाळासाहेब ढोले, सोमानाथ घोडेकर, दत्तू घोडेकर, विजय घोडेकर, अनिल घोडेकर, पोपट पठाडे, रुपेश उपाध्ये, अशोक मंडलिक, संतोष गाडेकर, भारत घोडेकर, बंटी घोडेकर आदींसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.