अवजड वाहनांमुळे दोन महिन्यांपूर्वी बांधलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्याची चाळण, अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी

Published on -

श्रीगोंदा- दोन महिन्यापूर्वी तयार झालेल्या लिंपणगाव – रेल्वे स्टेशन रस्त्याची चाळण या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय होके यांनी रस्त्याची पाहणी करत अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची होणारी दुर्दशा रोखण्यासाठी १० टन वहन क्षमता असलेल्या रस्त्यावरून ४०-४५ टन वजनाची अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. अशी मागणी परिवहन विभागाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली.

म्हातारपिंप्री श्रीगोंदा स्टेशन लिंपणगाव ते अजनुज या रस्त्याचे दोन महिन्यापूर्वी काम पूर्ण करण्यात आले होते. रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी परिसरातील नागरिकांना हा जवळचा रस्ता आहे. अवघ्या दोन महिन्यात या रस्त्याचे पहिल्याच पावसात हा रस्ता ठिकठिकाणी उखडल्याने खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वाराच्या अपघाताला आमंत्रण मिळत आहे. या रस्त्याची वाहन क्षमता ही १० टनाची आहे.

त्यानुसार कामाचे अंदाजपत्रक तयार करुन काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र या रस्त्यालगत असलेल्या प्लँटवरुन ४५ टनापर्यंतची अवजड वाहतूक रस्त्यावरुन होत आहे. तसेच रस्त्यालगत असलेल्या जिनिंग मिल मधुनही अवडज वाहतुक सदर रस्त्यावरुन होत असल्यामुळे रस्त्याचे काम हे खराब होत असल्याचे निदर्शनास आले.

अवजड वाहनांमुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून, या खराब झालेल्या रस्त्याची वारंवार दुरुस्ती करुनही अवजड वाहतुकीमुळे रस्ता पुन्हा खराब होत आहे. रस्त्यावरून ४० टन वजनाची अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी परिवहन विभागाकडे करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!