हिरव्या मिरचीला अपवाद वगळता वर्षभर चांगला भाव असतो. योग्य नियोजन केल्यास मिरचीचे उत्पादनही चांगले मिळते. त्यातून पैसेही चांगले मिळतात. हिरवी मिरचीचे सरासरी १५० ते २०० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. लाल वाळलेली मिरची १५ ते २० क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.
लागवडीची वेळ : खरीप : जून जुलै, पाण्याचे प्रमाण : १.० ते १.२५ किलो प्रती हेक्टरी. रोपवाटीकेत रोपे तयार करावीत (४० ते ४५ दिवस), लागवडीचे अंतर : खरीपः ६० ७ ४५ सेमी. खतांची मात्रा : १०० : ५० : ५० नत्र स्फुरद पालाश किलो/हेक्टरी, आंतर मशागत : १५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करणे. लागवडीपासून ३० व ४५ दिवसांनी बरखताच्या मात्रा द्याव्यात.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन : अ) सेंद्रिय खते : २० ते २५ टन शेणखत/हेक्टर, ब) जीवाणु खते : स्फुरद विरघळणारे जीवाणू २५ ग्रॅम/किलो बियाण्यास चोळावे. खते देण्याची वेळ : १) सेंद्रिय खते लागवडीपूर्वी १५ दिवस अगोदर द्यावे. २) रासायनिक खते १००:५०:५० किलो नत्र स्फुरद पालाश / हेक्टर, अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावी व उर्वरीत ५० किलो नत्र २ समान हप्त्यात विभागून ३० व ४५ दिवसांनी द्यावे.
आंतरमशागत: ३) जीवाणू खते बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे. ४) बियाण्यास ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रती किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. १५ ते २० दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करणे. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर लावावी. म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत. कीड व रोग: अ) फुलकिडे : फुलकिडे हे पानाच्या खालच्या व वरच्या बाजूस राहतात आणि पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात.
पाने लहान होतात यालाच बोकड्या किंवा चुरडा-मुरडा असे म्हणतात. या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. त्याच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% एस.एल. ५ मिली किंवा फिप्रोनिल ५ एस.सी. २० मिली. या किटकनाशकाच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात. फवारणी करतांना पावसाळी वातावरणामध्ये चिकट द्रव्याचा (०.१%) वापर जरूर करावा.
शेतामध्ये निळे चिकट सापळे एकरी १० ते १२ या प्रमाणात वापरावे. व) पांढरी माशीः या किडीची पिल्ले तसेच प्रौढ माशी पानातील रस शोषण करतात. त्यामुळे झाडाची पाने लहान आकार होऊन चुरडली जातात व उत्पन्नात घट येते. या माशीमुळे विषाणुजन्य रोगाचा प्रसार होतो.