पाथर्डी तालुक्यात कोणी गुंडगिरी केली तर त्याला फोडून काढले जाईल, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचा इशारा

Published on -

पाथर्डी- हिंदु मुस्लिम असा वाद करु नका. माणुस म्हणुन आपण सर्वजण सारखेच आहोत. चांगेल कर्म करा चांगलेच होईल. तुम्ही एकतेने रहा प्रेमाने वागा. देव सर्वांचाच आहे. भक्ती मार्ग स्वीकारा. येथील देवाच्या दारात भेद भाव नको. तुम्ही चांगले राहीले तर प्रशासन तुम्हाला मदत करील. मात्र कोणी गुंडगिरी केली तर त्याला फोडुन काढले जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिला.

माणिकदौंडी येथील ग्रामपंतचायत कार्यालयात पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही समाजाच्या प्रमुखासह नागरीकांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आदिनाथ महाराज आंधळे, नवनाथ चव्हाण, पोपट तोडकर, संपत गायकवाड, पोपटभाई पठाण, समीर पठाण, जलाल पठाण, शायद पठाण, लक्ष्मणराव पवार, सुहास गायकवाड, धनराज चाळक, रमीज पठाण, बाळासाहेब कांबळे, मिठु शेळके, वसंतराव वाघमारे, ग्रामसेवक सचिन दळवी यांच्यासह हिंदु-मुस्लीम ग्रामस्थ उपस्थीत होते.

एकतीस वर्षापासुन हिंदु-मुस्लिम दोन्ही समाजात वाद होवुन बलखंडी बाबा यांच्या मंदिरातील पुजा बंद पडलेली आहे. येथील जुना इतिहास स्थानिक नागरीक सांगतात. गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या माणिकदौंडी गावात देवाच्या येथील बासरी वाजविण्याचा मान लोंढे कुटुंबाला, संदल, चादर चढविण्याचा मान आठरे कुटुंबाला, दिवा लावण्याचा व नगारा वाजविण्याचा मान पठाण कुटुंबाला, गावातील गणपतीत पठाण कुंटुबाला मान, तर मोहरमच्या ताबुदाला खांदा देण्याचा मान शंकर कुलकर्णी यांना होता.

गावात पंढरपुरची महीनावारी सुरु होती. त्यामधे मुस्लीम देखील पांडुरंगाच्या दर्शनाला जात होते. काही वाद झाले मात्र देवाची पुजा बंद पडली. वाद न्यायालयात सुरु होता. आता दोन्ही बाजुचे नागरीक सामजस्यांने वागत आहेत. कोणताही वाद नाही. पारंपारीक पद्धतीने पुजा करण्यासाठी आम्ही परवानगी मागत आहोत असे ग्रामस्थ म्हणाले. आदिनाथ महाराज आंधळे यांनी प्रस्ताविक केले. वसंत वाघमारे यांनी आभार मानले.

माणिकदौंडीतील वाद मिटवा

बलखंडी बाबांची पूजा करण्यास परवानगी द्यावी. तसेच देवाच्या येथे झालेली पडझड दुरुस्त करण्यासाठी दोन्ही समाजाला परवानगी मिळावी. एकत्रीतपणे सर्वजन राहतील अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली आहे. न्यायालयात देखील हा वाद संपविण्यासाठी दोन्ही बाजुच्यावतीने प्रयत्न करण्यात येतील किरकोळ व खाजगी वादाला जातीचे-धर्माचे स्वरुप देवु नये अशी विनंती करण्यात आली. दोन्ही बाजुच्या वतीने सामजस्यांची भुमिका घेण्याचे नागरीकांनी ठरविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!