अहिल्यानगरमध्ये पैश्यांसाठी सराफा व्यापाऱ्याच्या मुलाच्या डोक्याला लावली पिस्तुल तर बायकोचाही केला विनयभंग, ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Published on -

अहिल्यानगर- शहरातील एका सराफ व्यापाऱ्याने केडगाव येथील एक महिलेकडून व्याजाने २६ लाख घेतले. व्याजापोटी ४९ लाख रुपये वेळोवेळी दिले. तरीही ती महिला अन्य काही लोकांनी ७जुलै रोजी पैशासाठी व्यापाऱ्याच्या मुलाच्या डोक्याला पिस्तुल लावला. तसेच, त्याच्या पत्नीला ओढत घराच्या दरवाजापर्यंत आणून विनयभंग केला. ही घटना सराफ बाजार व स्वास्तिक चौकातील सराफ व्यापाऱ्याच्या घरी घडली. याप्रकरणी त्या महिलेसह ११ जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कविता रमाकांत पराळे, सोहन सुरेश सातपुते, रमांकात पराळे (तिघे रा. केडगाव अहिल्यानगर) यांच्यासह आणखी तिघे व ४ ते ५ बाउंन्सरचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. याप्रकरणी गणेशवाडी स्वास्तिक चौक अहिल्यानगर येथे राहणाऱ्या सराफ व्यापाऱ्याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, कविता पराळे व सोहन सातपुते यांच्याकडून फिर्यादीने व्याजाने २६ लाख रुपये घेतले होते.

त्या पैशाच्या व्याजापोटी वेळोवेळी ४९ लाख १ हजार ५०० रुपये रोख, ऑनलाईन व आरटीजीएसद्वारे दिले होते, असे असतानाही जून महिन्यात आरोपी कविता पराळे ही घरी आली. तिने घरातील लोकांना दमबाजी करून मला माझे पैसे द्या असे म्हणून चार चाकी मोटारकार बळजबरीने घेऊन गेली. ६ जुले २०२५ रोजी दुपारी १२ वाजण्याचे सुमारास व ७ जुलै रोजी संध्याकाळी वरील आरोपी व त्यांच्यासोबत ४ ते ५ बाऊंन्सर फिर्यादीच्या घरात अनाधिकृतपणे घुसले.

रमांकात पराळे याने फिर्यादीच्या मुलाच्या टी शर्टला धरून उचलले. शिवीगाळ केली. फिर्यादीच्या वडिलांच्या नावावर असलेली दुसऱ्या हाताने कमरेचा पिस्तुल काढून त्याच्या डोक्याला लावला. १५ लाख रुपये दे नाही, तर याला इथच मारून टाकतो, असे म्हणाला. फिर्यादी व त्यांच्या पत्नीने हाता-पाया पडून मुलाला सोडविले. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या पत्नीचा कुर्ता फाडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. शिवीगाळ करुन निघून गेले, असे फिर्यादीत म्हटले. या प्रकरणी खंडणी व सावकारकी अधिनियम कायद्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!