अहिल्यानगर- पोलिस कर्मचाऱ्याचे पत्नीबरोबर किरकोळ वाद झाले. त्या पोलिस दादाच्या आईने आणि भावाने त्याच्या पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना तपोवन रस्ता पसिरात १४ जुलै रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिस दादाच्या पत्नीने तोफखाना पोलिस ठाण्यात सासू व दीर यांच्या विरोधात फिर्याद दिली.
फिर्यादीत म्हटले की, १३ जुलै रोजी रात्री पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस दादा बहिणीकडे केले. त्यावेळी पत्नी एकटीच घरी होती. तिची सासू आणि दीर असे दोघे घरी आले. तु आमच्या भावाबरोबर सतत भांडत असते, असे म्हणून त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण कली. सासूने केस धरून खाली पडले.

शिवीगाळ करून जबर मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यांच्या तावडीतून सुटून बाहेर पळून गेले. पुन्हा घरी आले असता त्यांनी घराला कुलूप लावलेले होते. त्यानंतर ११२ ला कॉल करून हकीगत सांगितली. वरील दोघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.