अहिल्यानगर- अहिल्यानगर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने अहिल्यानगर तालुक्यासाठी मंडळनिहाय जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी कार्यकारीणीमध्ये तरुणांना तसेच सर्व भागात न्याय देण्याच्या दृष्टीने समतोल साधत जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे.
तालुक्यातील प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्याने आगामी निवडणुकीत त्याचा फायदा भाजपाला निश्चितपणे होणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. भाजपाने जाहीर केलेली कार्यकारणी वडगाव गुप्ता-निंबळक मंडळ, वाळकी चिचोंडी पाटील मंडळ व जेऊर नागरदेवळे मंडळनिहाय कार्यकारणी जाहीर केली आहे.

वडगाव गुप्ता व निंबळक मंडळामध्ये शशिकांत उर्फ दीपक कार्ले यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. तर उपाध्यक्ष म्हणून विकास काळे, विशाल कर्डिले, प्रशांत आडसुरे, भाऊसाहेब काळे, सौ. सुनीता येणारे, शितल कोतकर, सरचिटणीस संदीप परभणे, नूतन उरमोडे, चिटणीस शुभम भोंग, महेश कुंड, केतन निकम, सुशांत झरेकर, पूजा आंबेडकर, मनीषा धनवट, कोषाध्यक्ष सचिन घाडगे तर कार्यकारिणी सदस्य म्हणून उत्कर्ष कर्डिले, विकास सूळ, मोहन गहिले, शुभम गिरवले, संदीप लष्करे, उमेश डोंगरे, सुरज भोर, लहू ढमढेरे, तुषार चोभे, संदीप भोर, अनुजा काटे, सुजाता कार्ले, स्वाती गहिले, युवराज लोटके, राहुल कारंडे, सागर शिंदे, महेश कोठुळे, अजित तांबे, अजित निमसे, अमोल निमसे, संभाजी रुपनर, सावळेराम रुपनर, सुभाष चाबुकस्वार, दत्तात्रय शेवाळे, अलका बोरुडे, संतोष कोऱ्हाळे, नरेश शेळके, लता फलके, मयूर नरवडे, सुनीता येणारे, शारदा पवार, मंगल गवळी, गोकुळ बोरुडे, मनीष कांबळे, इंद्रजीत चोभे, हर्ष लांडगे, वैभव दळवी, विवेक घाडगे, अक्षय दरेकर, रवींद्र पवार, संतोष रोकडे, बाळासाहेब जंगम, रवींद्र कल्हापुरे, तुषार घोडके, संतोष दळवी, सुभाष शेळके, विकास गिरे तर किसान मोर्चा अध्यक्ष अंबादास शेळके, महिला मोर्चा अध्यक्ष मंगल गवळी, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुधीर कांबळे, युवा मोर्चा अध्यक्ष युवराज कार्ले यांची निवड करण्यात आली आहे.
वाळकी- चिचोंडी पाटील मंडल कार्यकारिणी अध्यक्ष गहिनीनाथ दरेकर, उपाध्यक्ष संतोष भापकर, गोरख आनंदकर, बाबासाहेब काळे, महेश लांडगे, बाळासाहेब ठोंबरे, अंबादास भालसिंग, सरचिटणीस संतोष धावडे, केशव वाबळे, निलेश दरेकर, योगेश कासार, चिटणीस चंद्रकांत पिंपळे, संजय कदम, सुनील म्हस्के, विक्रम लबडे, रावसाहेब रणसिंग, भगवान तापकीर, महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन लांडगे, किसान मोर्चा अध्यक्ष अंकुश नवसुपे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष परमेश्वर पालवे, अनुसूचित जाती-जमाती मोर्चा अध्यक्ष सोमनाथ साठे, युवा मोर्चा सरचिटणीस सागर कासार, कार्यकारिणी सदस्य संतोष कोतकर, विजय कासार, सतीश चौधरी, सुधीर भापकर, शरद कोतकर, सोपान कुलांगे, बंटी दरेकर, सागर चितळकर, शरद गायकवाड, बाळासाहेब ठोंबरे, वैभव मुनफन, वाल्मीक वाबळे, दादा गव्हाणे, राम बोरकर, ललित नवले, भाऊ शिंदे, महादेव निमसे, रवींद्र अमृते, राम साबळे, अशोक शिंदे, नंदू पवार, अमोल खेडकर, गणेश बोडखे, मकरंद हिंगे, सुभाष निमसे, प्रवीण खांदवे, विजय गाडे, शशिकांत पांडुळे, अर्जुन खराडे, यासीन शेख, दीपक हजारे, सतीश कोकाटे, संभाजी वामन, शंकर साठे, उद्धव कांबळे, दत्तात्रय भोपे, दत्तात्रय मोहिते, बाबासाहेब बेरड, नंदू पालवे यांची निवड करण्यात आली आहे.
जेऊर – नागरदेवळे मंडळ अध्यक्ष राम पानमळकर, उपाध्यक्ष देविदास आव्हाड, सदाशिव पवार, बद्रीनाथ बेरड, गोविंद वाघ, मंजाबापू बेरड, पूजा नागरे, महिला अध्यक्ष अंजना येवले, ओबीसी मोर्चा अध्यक्ष दिनेश बेल्हेकर, अनुसूचित जाती जमाती मोर्चा अध्यक्ष सूर्यकांत पाखरे, किसान मोर्चा अध्यक्ष विश्वनाथ गुंड, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत जरे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मुसा शेख, महिला मोर्चा सरचिटणीस सोनाली भंडारी, सरचिटणीस प्रकाश कर्डिले, महिला मोर्चा चिटणीस दिपाली भडके, चिटणीस शंकर बळे, गणेश भगत, नवनाथ पालवे, विजय खोमणे, रूपाली कदम, सौ. केशर पटारे, महिला उपाध्यक्ष भाग्यश्री बनकर, कार्यकारिणी सदस्य महिला- दिपाली गारदे, प्रियंका शिंदे, संगीता विटेवाड, निकिता वाघस्कर, मोनिका आढाव, अरुणा कांबळे, चिटणीस- राहुल गोंधळे, राजेंद्र तोडमल, कार्यकारिणी सदस्य- गुलामदस्तगीर शेख, भीमराव आव्हाड, गजनफर सय्यद, सोमनाथ पालवे, नानाभाऊ सुसे, भरत कदम, महेश आव्हाड, संदीप कराळे, भागवत कदम, ज्ञानेश्वर बेरड, अशोक बेरड, अण्णासाहेब कातोरे, एकनाथ विरकर, अंकुश आव्हाड, भाऊसाहेब कर्पे, भानुदास आवारे, स्वप्नील तवले, संजय धोत्रे, हरिश्चंद्र साळुंखे, अविनाश कांबळे, सुहास साठे, सचिन वारुळे, विनायक कर्डिले, सुभाष गुंजाळ, लक्ष्मण ससे, जगन्नाथ मगर, सुभाष आढाव, कचरू सोनार, विराग गायकवाड, प्रकाश घोरपडे, बबन आव्हाड, गोरक्षनाथ दुसुंगे, आकाश पासलकर, भाऊसाहेब पानमळकर, सनवर खान, सोमनाथ तोडमल यांची निवड करण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात तरुण तसेच महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आल्याने तालुक्यातील भाजपच्या गोटामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. निवड झालेल्या सर्व सदस्यांचे ना. राधाकृष्ण विखे, आ शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार सुजय विखे, आ. विक्रमसिंह पाचपुते, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी अभिनंदन केले आहे.