शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करा; उपोषणाचा इशारा

Published on -

शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने, ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी (दि. २१) जुलै रोजी महसूल आयुक्त कार्यालय नाशिक नाशिक विभाग, नाशिक येथे उपोषणास बसण्याचा इशारा सचिन खंडागळे, अशोक दळवी, इलियास पठाण, समीर शेख, आदिल पठाण यांनी बहुजन मुक्ती संघटना व दहिगाव ने ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे महसूल आयुक्त, नाशिक यांना दिला आहे.

निवेदनाच्या पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार शेवगाव, प्रांताधिकार, पाथर्डी, पोलीस निरीक्षक, शेवगाव यांना दिल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने ग्रामपंचायतीच्या २०१७ ते २०२३ या कालावधीतील कारभाराची चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई व्हावी. यासाठी संघटनेच्या वतीने यापूर्वी (दि २) ऑगस्ट २४ मध्ये पंचायत समिती, शेवगाव या ठिकाणी उपोषण केले होते.

त्यानंतर (दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी पाथर्डी प्रांत कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात आले. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या तक्रारीच्या संदर्भात एक चौकशी समिती नेमली होती. परंतु सदर समितीने कोणत्याही प्रकारची माहिती तक्रारदार यांना दिली नाही. त्यामुळे याच मागणीसाठी (दि.२१) जुलै रोजी महसूल आयुक्त, कार्यालय नाशिक येथे उपोषण करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!