संगमनेरमधील ‘त्या’ ठेकेदार कंपनीची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा, आमदार अमोल खताळ यांची विधानसभेत मागणी

Published on -

संगमनेर- पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात ४ जुलै रोजी झालेल्या स्कूलबस अपघातप्रकरणी जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या बसचे फिटनेस ऑडिट करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत ४८ अपघातांमध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आ. अमोल खताळ यांनी विधानसभेच्या सभागृहात मांडत या अपघातांना कारणीभूत ठरलेली कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाशी केलेल्या कराराचे उल्लंघन केले असून, काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे चंदनापुरी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

त्यातच चंदनापुरी घाटात काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. त्यामुळेच स्कूलबस पलटी होऊन अपघातात झाला होता. त्यात १६ विद्यार्थी जखमी झाले होते. अपघातग्रस्त बसला परिवहन विभागाकडून परवानगी होती का, असा सवाल उपस्थित करत त्याची चौकशी करा, अशी स्पष्ट मागणी करत आ. खताळ यांनी सर्व स्कूल बसचे फिटनेस ऑडिट तातडीने करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!