कोल्हार- कोल्हारच्या पुलावर ट्रकखाली चिरडून सायकस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. ट्रक चालक घटनेनंतर पसार झाला आहे.
सलीम बाबू शेख ( वय ६३ रा. अंबिकानगर, कोल्हार) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फळ विक्रेत्याचे नांव आहे. काल दुपारी चारच्या सुमारास मयत सलीम शेख आपल्या सायकलवरून कोल्हार खुर्द कडे जात असताना आर जे १९ जी एच २७८५ या ट्रॅक खाली सापडून सदर इसमाचा जागीच मृत्यू झाला. सदर धडकेत मृत सलीम याच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. रस्त्यावर मास आणि रक्ताचा सडा पडला होता.

घटनेनंतर लोणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लोणी पोलीस व स्थानिकांनी अक्षरशः मृतदेहाचे तुकडे गोळा करून रुग्णवाहिकेत टाकले. अपघातानंतर अपघातग्रस्त ट्रक चालक पसार झाला आहे.
मयत सलीम शेख हे सायकलवरून पडल्याने ट्रकच्या चाकाखाली आले असल्याचे काही प्रत्यक्षदर्शी बोलत होते. त्यामुळे या अपघाताविषयी तर्कवितर्क काढले जात आहेत. मृत सलीम शेख यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.