जामखेड- येथील व्यापारी तुषार कुकरेजा यांची कोकणातील एका व्यापाऱ्याने मोठ्या रकमेची फसवणूक केली होती. कुकरेजा हे याबाबतची तक्रार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्याकडे घेऊन गेले होते. प्रा.राळेभात यांनी जामखेड कर्जतचे भूमिपुत्र सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे जात संपूर्ण माहिती सांगितली.
ना. शिंदे यांनी याबाबत तातडीने दखल घेऊन संबंधित व्यापाऱ्यास फोन करून संबंधित व्यक्तीला याप्रकरणी जाब विचारून जामखेड येथील व्यापारी तुषार कुकरेजा यांची रक्कम परत करण्याचे अथवा त्या रकमेचा माल पाठवण्याचे सांगितले. थेट विधानपरिषद सभापतींचा फोन आल्याने संबंधित व्यापाऱ्याचे धाबे दणाणले आणि त्याने तात्काळ काही माल पाठवला व उर्वरित माल देखील लवकरच देण्याचे कबूल केले.

या घटनेमुळे भूमिपुत्राच्या मागे भूमिपुत्रच खंबीरपणे उभा आहे असा विश्वास संपूर्ण व्यापारी बांधवांना मिळाला आहे. या घटनेनंतर जामखेड तालुक्यातील सर्व व्यापारी बंधूंच्यावतीने सभापती राम शिंदे यांचा चौंडी येथे निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यासाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, नगरसेवक पवनराजे राळेभात, व्यापारी पिंटू बोरा, मिलन कांकरिया, बाळू रणभोर, आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांच्यासह अनेक व्यापारी व राजकीय नेत्यांनी विशेष मोलाची मदत व सहकार्य केल्याने तुषार कुकरेजा यांना त्यांची अडकलेली मोठी रक्कम सभापती राम शिंदे यांच्या तत्परतेमुळे परत मिळाली.
त्यामुळे आज व्यापाऱ्यांमध्ये आपला तो आपलाच अशी भावना निर्माण झाली असून सर्व व्यापारी वर्गातून ना. शिंदे यांचे अभिनंदन केले जात आहे. व्यापारी तुषार कुकरेजा यांनी सभापती राम शिंदे व ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, नगरसेवक पवनराजे राळेभात, उद्योजक पिंटू बोरा, मिलन कांकरिया, बाळू रणभोर यांचे विशेष आभार मानले आहेत.