मिरजगाव- नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात कैकाडी समाजाच्या न्याय विषयी भूमिका मांडल्याने आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कैकाडी समाज बांधवांच्यावतीने त्यांच्या या भूमिकेचे स्वागत व समर्थन करून आभार मानण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील कैकाडी समाजाची परिस्थिती अतिशय दयनीय असुन विदर्भात त्यांचा
समावेश एस.सी प्रवर्गामध्ये आहे. तर मराठवाड्यात त्यांचा समावेश व्ही.जे.एन.टी प्रवर्गामध्ये आहे. एकच समाज दोन वेगवेगळ्या प्रवर्गात कसा असु शकतो.

याबाबत सभागृहात आ.धस यांनी सामाजिक न्यायिक भूमिका मांडून कैकाडी समाजाच्या जात क्षेत्रीय बंधनाविषयी मुद्दा उपस्थित करून क्षेत्रीय बंधन उठविण्यासाठी आवाज उठवून या समाजाच्या असलेल्या जिव्हाळ्याच्या व दुर्लक्षित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. व कैकाडी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी सभागृहात केली.
आ. सुरेश धस यांनी कैकाडी समाजाचा हा प्रश्न विधानसभा सभागृहात मांडल्याने राज्यातील कैकाडी समाज बांधवांच्यावतीने आ. सुरेश धस यांचे निवासस्थानी जाऊन आभार व्यक्त करण्यात आले. तसेच पुढील काळात दुर्लक्षित झालेल्या या समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी कैकाडी समाजाचे पदाधिकारी मनोहर जाधव, पोपटराव गायकवाड, प्रा. कैलास माने, टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव, पै. अमोल माने, उल्हास माने, सुभाष जाधव, सुरेश जाधव, पै. देवा जाधव, टायगर ग्रुप आष्टी तालुकाध्यक्ष पै.गणेश जाधव, अॅड. दिपक शामदिरे, डॉ. रमाकांत शामदिरे, दिलीप जाधव, मोहन जाधव, अश्रू जाधव, पै.किरण जाधव, प्रकाश जाधव, जनार्दन जाधव, गोवर्धन जाधव, पै. ईश्वर माने, विक्रम माने, अशोक माने यांच्यासह मराठवाडा, पुणे, कडा, आष्टी, जामखेड, मिरजगाव, कर्जत आदींसह राज्यभरातून कैकाडी बांधव उपस्थित होते.