नगर जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या एनएच १६० या महामार्गाच्या रूंदकरणाच्या कामात प्रचंड दिरंगाई होत असल्याने जनतेमध्ये नाराजीचा सुर उमटत असून या नाराजीची दखल घेत खासदार नीलेश लंके हे या कामास सुरुवात करावी या मागणीसाठी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी अहिल्यानगर येथे सकाळी ११ वाजल्यापासून बेमुदत उपोषणास बसणार आहेत.

सावळी विहीर किमी ८८.४०० ते अहमदनगर बायपास किमी १६३.४०० या ७५ किमी लांबीच्या फोर लेन महामार्ग रूंदीकरणासाठी भारत कन्स्ट्रक्शन इंडिया प्रा. लि., देहरादून या कंपनीला ठेका देण्यात आला असून २१ मार्च २०२५ रोजी ठेका करार पार पडला होता. २९ एप्रिल रोजी सबंधित कंपनीस काम मंजुर होउनही आज अखेर कोणतेही काम प्रत्यक्ष सुरू झालेले नाही. त्याविरोधात पत्रव्यवहार करण्यात येऊनही दखल न घेतल्याने खा. लंके यांनी उपोषणाश्र उगारले आहे.
या मागण्यांसाठी उपोषण
तात्काळ प्रत्यक्ष कामास सुरूवात करावी, कामाची प्रगती व योजनाबध्द वेळापत्रक सादर करावे, स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.