पाथर्डी शहरातील मावा व्यावसायिकांविरुद्ध धडक कारवाई करीत परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने १ लाख ३३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
यामध्ये दोन जणांना ताब्यात घेतले आहे तर दोन जण पसार झाले आहेत. मावा, सुंगधी तवांखू व मावा तयार करण्याचे मशीन जप्त करण्यात आलेआहे. अवैध व्यावसायिकांनी खाडे यांच्या पथकाचा चांगलाच धसका घेतला आहे. पाथर्डी शहरातील अभिजीत मीनीनाथ लांडे यांच्या अक्षय पान स्टॉलवर खाडे गांच्या पथकाने छापा टाकला. तेथे आठ किलो मावा मिळाला.

त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून इंदिरानगर येथील अक्षय गणेश इधाटे याच्या येथे छापा टाकला. तसेच राहुल अर्जुन सानप व सुनील बाबासाहेब सानप यांच्याकडे छापा मारला असता, सुनील बाबा सानप (शिरसाटवाडी) याला ताब्यात घेतले.
मावा, सुंगधी तबांखु व मशीन, असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. अभिजीत लांडे व सुनील बाबासाहेब सानप यांना ताब्यात घेतले आहे. तर अक्षय इधाटे व राहुल सानप हे पसार आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस उपाधीक्षवा संतोष खाडे यांनी पाथर्डी तालुक्यातील अवैध व्यावसायिकांविरुध्द धडक मोहीम राबविली आहे. मावा तयार करणारे, अवैध दारु विक्रेते, पत्त्याचे क्लब यांच्या विरुध्द घेतलेली भूमिका उत्तम आहे.जनतेतून याचे स्वागत होत आहे.