तू माझ्या स्वप्नात येते, मला तुझ्याशी लग्न करायचंय, असं म्हणत अहिल्यानगरमधील महाराजाने केला विनयभंग

Published on -

अहिल्यानगर- एमआयडीसी परिसरात एका मठात कुटुंब देवदर्शनासाठी जात होते. तिथे संबंधित व्यक्तीची ओळख झाली. तो महाराज असल्याचे सांगता होता. त्याने मुलीच्या इंस्टाग्रामवर वारंवार लग्नाची मागणी करून विनयभंग केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कानिफ सुरेश राऊत (रा. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की आम्ही कुटुंबासह एमआयडीसी परिसरातील मठामध्ये देवदर्शनासाठी जात होतो. तिथे कानिफ राऊत यांची ओळख झाली. तो आम्हाला महाराज असल्याचे सांगत होता.

एक दिवस मुलगी आजारी पडल्याने तिला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने सांगितले की, वरील महाराज गेल्या चार ते पाच दिवसांपासून वारंवार इंस्टाग्रामवर मेसेज करून ‘माझ्याशी लग्न कर, तु माझ्या स्वप्नात येते. आपण डोंगरगणला जाऊ’ असे म्हणत आहे. त्याला नाही म्हटले तरी तो वारंवार मेसेज करीत आहे. पोलिस ठाण्यात गेला तर तुमची बदनामी होईल, अशी धमकी देत आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल रोहिणी दरंदले गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe