श्रीगोंदा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतवर ‘महिलराज’ ; अनेक दिग्गजांची होणार कोंडी

Published on -

अहिल्यानगर : नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणात श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी पिंपळगाव पिसा, कोळगाव, आढळगाव, वांगदरी, मढेवडगाव, बेलवंडी, सांगवी दुमाला, येळपणे, पेडगाव या राजकीय दृष्ट्या प्रमुख असलेल्या गावांसह ४३ गावांमध्ये आरक्षित झालेले महिला आरक्षण नवीन आरक्षण नुसार दोन ने कमी होऊन ४१ गावांमध्ये महिलाराज येणार आहे. त्यामुळे आजी माजी आमदारांच्या गावासह अनेक ठिकाणी राजकीय उलथापालथ होणार असून अनेकांचा हिरमोड देखील होणार आहे.

जानेवारी २०२१ मध्ये सरपंच आरक्षण काढण्यात आलेल्या तालुक्यातील घारगाव, मांडवगण, महांडुळवाडी, कोकणगाव, आणि भावडी या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर आरक्षणानुसार झालेल्या नसल्याने त्यांचे आरक्षण कायम ठेवून उर्वरित ८२ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत प्रभारी तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले. या आरक्षणात किरकोळ बदल वगळता मागील आरक्षण जैसे थे राहिले.

अनुसूचित जाती व्यक्तीसाठी निंबवी, सारोळा सोमवंशी, देवदैठण, कोसेगव्हाण, भानगाव तर महिलेसाठी एरंडोली, देऊळगाव, तांदळी दुमाला, हिंगणी दुमाला, घोटवीसाठी आरक्षित झाले.
अनुसूचित जमाती व्यक्ती साठी आनंदवाडी, घुगलवडगाव तर दाणेवाडी, बाबुर्डी, वांगदरी या गावात महिला सरपंच पदासाठी सोडत निघाली.

नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी वेळू, टाकळी कडेवळीत, लिंपणगाव, चिंभळा, लोणी व्यंकनाथ, शिरसगाव बोडखा, म्हातारपिंपरी, घोगरगाव, खांडगाव, ढोरजे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी चांडगाव, कौठा -शिपलकर वाडी, गव्हाणेवाडी, रायगव्हाण, कोरेगाव, , कोथळ, पिसोरेखांड, कोंडेगव्हाण, ढवळगाव, म्हसे गावसाठी सोडत निघाली.

सर्वसाधारण व्यक्तीसाठी आर्वी – अनगरे, उक्कडगाव, उख्खलगाव, कोरेगव्हाण, घोडेगाव, चांभुर्डि, टाकळी लोणार, अजनुज, तरडगव्हाण, पारगाव सुद्रिक, बांगर्डे, बेलवंडी कोठार, मुंगूसगाव, राजापूर, रुइखेल, गार, विसापूर, शेडगाव, सुरोडी, हिरडगाव, येवती, सुरेगाव, चवर सांगवी तर सर्वसाधारण महिलेसाठी चोराचीवाडी, वडाळी, आढळगाव, पेडगाव, अधोरेवाडी, काष्टी, चिखलठाण वाडी, निमगाव खलु, सांगवी दुमाला, हंगेवाडी, बोरी, येळपणे, मढेवडगाव, अरणगाव दुमाला, बेलवंडी बु., माठ, कोळगाव, पिंपळगाव पिसा, घुटेवाडी, चिखली, बनपिंपरी, थिटे सांगवी, कामठी या गावांचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!