.अहिल्यानगर : टिकटॉकवर झालेल्या ओळखीने एका विवाहित महिलेच्या संसारात मोठे वादळ निर्माण झाले. टिकटॉकवर झालेल्या ओळखीतून पुढे भेटी गाठी वाढवत नंतर लग्नाचे आमिष दाखवुन विवाहित महिलेशी शारीरिक संबध ठेवुन तिची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आरोपीने तिसगाव व लोणावळा येथील हॉटेलवर घेवून जात महिलेवर अत्याचार केलेला आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिसात तिघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.यातील अलीम अब्बास शेख (रा.शेवगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता त्यास तिन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिला आहे.

याबाबत अधीक माहिती अशी, २०२१ मध्ये पीडित महिलेचे व अलीम शेख यांची टिकटॉकवर ओळख झाली. पीडित महिला ठाणे येथे नालासोपारा भागात राहत होती. मग फोननंबर मिळाला व सवांद सुरु झाला. थोड्या दिवसात भेटण्यासाठी लोणावळा ये थील एक जागा ठरली तेथे मुक्काम ठरला व संबंधिताने पीडितेसोबत शरीर संबध ठेवले.
त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवुन आरोपीने या पीडित महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला. तिसगाव येथील एका हॉटेलवर ९ ते ११ जून २०२५ रोजी मुक्कामी ठेवुन तेथेही अत्याचार केला. या प्रकारात आरोपीचे दोन मेहुणे देखील सहभागी असल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.
तुमचे लग्न लावुन देवु असे सिकंदर मजनू शेख (रा.तिसगाव ता.पाथर्डी जि.अहिल्यानगर), राजू गुलाब शेख (रा.शेवगाव जि.अहिल्यानगर) यांनी पीडित महिलेला आश्वासन दिले होते. ऑगस्ट २०२२ ते ११ जून २०२५ या कालावधीत अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.
पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक संदीप ढाकणे हे करीत आहेत. या प्रकरणी अटक केलेल्या अलीम अब्बास शेख याचे पहिले लग्न झालेले होते. त्याचा तलाक ही झालेला आहे